SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाईकवर मागे बसण्यापूर्वी ‘हे’ नवे नियम वाचा..! मोदी सरकारकडून अनेक महत्वपूर्ण बदल..! काय होणार परिणाम..?

बाईक वापरणाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टू-व्हिलर (Two-Wheeler) चालकांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार दुचाकीस्वाराच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत.

देशातील रस्ते अपघातात बहुतांश अपघात टू-व्हिलरचे होत असतात. त्यात अनेकांचा बळी गेला आहे. रस्तेअपघात आणि त्यातून जाणारे बळी रोखण्यासाठी मोदी सरकारने काही नवीन नियम आणले आहेत. दुचाकीवर बसण्यापूर्वी हे नियम माहिती करुन न घेतल्यास खिशाला फटका बसू शकतो.

Advertisement

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टू-व्हिलर वापरणाऱ्यांसाठी कोणते नियम आणले आहेत, ते कसे फायद्याचे ठरणार आहेत, याबाबतचा घेतलेला आढावा..

दुचाकीस्वारांसाठीचे नवे नियम

Advertisement

दुचाकीला ‘हँड होल्ड’
बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूला आता हँड होल्ड (Hand Hold) असणे आवश्यक आहे. गाडीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी हँड होल्ड महत्वपूर्ण ठरणार आहे. चालकाने अचानक बाईकचे ब्रेक लावल्यास मागच्या व्यक्तिसाठी हे ‘हँड होल्ड’ उपयोगी ठरणार आहेत.

बाईकच्या दोन्ही बाजूने पायदान
बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूंनी पाय ठेवण्यासाठी पायदान आता अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बाईकवर पाय ठेवण्यास अडचण येणार नाही.

Advertisement

टायरच्या डाव्या बाजूला कव्हर
बाईकच्या मागील टायरच्या डाव्या बाजूचा कमीत-कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या कव्हर केलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे मागील टायरमध्ये अडकणार नाहीत.

कंटेनर लावण्याचे निर्देश
बाईकला छोटा कंटेनर लावण्याचे निर्देश दिले आहेत. कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी. कंटेनर मागील सीटजवळ लावल्यास केवळ ड्रायव्हरलाच मंजुरी असेल. मात्र, मागील सीटच्या मागे लावल्यास दुसऱ्या व्यक्तीला बसण्यास परवानगी असेल.

Advertisement

टायरबाबत गाईडलाईन्स
सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी ‘टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम’चा सल्ला दिला आहे. त्यातील सेंन्सरद्वारे ड्रायव्हरला टायरची स्थिती समजू शकेल. शिवाय टायर दुरुस्ती किटचीही शिफारस केली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement