आयसीसीने यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे (ICC T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूरोपमध्ये करण्यात आलं आहे.
भारत पाकिस्तान सामना कधी?
T-20 वर्ल्डकपमधील सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये होणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी दुबईत रंगणार आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
टी-20 वर्ल्डकप संघांचे ग्रुप व सामने:
पहिल्या राउंडमध्ये 8 टीम्स सुपर 12 मध्ये जागा मिळविण्यासाठी खेळणार, 17 ऑक्टोबरपासून पहिल्या राउंडचे सामने
▪️ ग्रुप-A: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे.
▪️ ग्रुप B: बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी सर्वोच्च दोन-दोन टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील.
सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार .
▪️ सुपर 12 ग्रुप 1: वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिकेसह पहिल्या राउंडच्या ग्रुप A मधील विजेता संघ आणि ग्रुप B चा रनर अप संघ असेल. सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
▪️ सुपर 12 ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह पहिल्या राउंडमधील ग्रुप B चा विजेता संघ आणि ग्रुप A ची रनर अप टीम असेल.
भारताचे सामने कधी?
▪️ भारत विरुद्ध पाकिस्तान – 24 ऑक्टोबर
▪️ भारत विरुद्ध न्यूझीलंड – 31 ऑक्टोबर
▪️ भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 3 नोव्हेंबर
▪️ भारत विरुद्ध ग्रुप B1 – 5 नोव्हेंबर
▪️ भारत विरुद्ध ग्रुप A2 – 8 नोव्हेंबर