भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ तेजीत आहे. म्हणूनच की काय, ओला कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच (Ola Electric Scooter Launch) करत दमदार एन्ट्री केली आहे. ओला कंपनीच्या बहुप्रतिक्षित अशा OLA स्कूटरच्या प्रीबुकिंग मोहिमेत जवळपास 1 लाख नोंदणीचा टप्पा आधीच पार झाला आहे.
Ola Electric Scooter चे दमदार फीचर्स:
▪️ कंपनीने S1 आणि S1 Pro दोन व्हेरीएंटमध्ये स्कूटर लॉंच केले आहे.
▪️ Ola S1 Electric Scooter भारतात 10 रंगांमध्ये उपलब्ध होईल.
▪️ ओला स्कूटरमध्ये 3.4kWh ची बॅटरी असणार आहे.
▪️ स्कूटरमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे.
▪️ या स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, लाईव्ह लोकेशन, ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम अशा ॲडव्हान्स सुविधा देण्यात आल्या आहेत.
▪️स्कूटर पूर्णपणे रिमोट कंट्रोल केले जाऊ शकते. याशिवाय यात व्हॉईस कंट्रोल सिस्टमही दिली आहे.
18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार
ओला S1 इलेक्ट्रिक स्कुटर चार्जिंगसाठी घरगुती सॉकेटचा तुम्ही वापर करू शकतात, असं कंपनीनं सांगितलं आहे. ही स्कुटर 6 तासांत फुल चार्ज होणार असल्याची माहीती दिली आहे. ही स्कुटर 50 टक्के चार्ज होण्यासाठी कमीत कमी 18 मिनिटांचा वेळ लागू शकतो. ओला फास्ट चार्जरच्या माध्यमातून ही 50 टक्के स्कुटर चार्ज करणे शक्य होईल.
Ola इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत:
भारतात ओला इलेक्ट्रिक स्कुटर ही 99 हजार 999 रूपयांना उपलब्ध होणार आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान ही चार शहरे वगळून इतर राज्यात किंमत ही 99 हजार 999 रूपये इतकी ठेवली गेली आहे, तर Ola S1 Pro साठीची किंमत 1 लाख 29 हजार 999 रूपये ठेवली आहे.
दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानसाठी वेगळी किंमत ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रात Ola S1 Electric Scooter 94 हजार 999 रूपये इतकी किंमत आहे, तर OLA S1 pro ची महाराष्ट्रात किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये ठेवली आहे.
ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल म्हणाले की, “ओला स्कूटर (Ola S1) फक्त 3 सेकंदात शून्य ते 40 किमी वेग गाठते. ओला भारतात जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन कारखाना बनेल. ही स्कूटर उत्तम डिझाईन व उत्तम तंत्रज्ञानाने बनविली आहे. स्कूटरची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होईल”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews