देशातील नागरीकांसाठी आधार कार्ड हे जवजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडतं. मग आधार कार्डमध्ये जर तुम्हाला तुमचा पत्ता (Aadhar Update) अपडेट करावयाचा असला, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
UIDAI ने आधारमध्ये अॅड्रेस अपडेट करण्यासाठीच्या काही नियमांत बदल केले आहेत. आता अॅड्रेस प्रुफशिवाय आधारमध्ये अॅड्रेस अपडेट (Aadhaar Card Address Change Process) करता येणार नाही. UIDAI ने यापूर्वी या नियमांत सूट दिली होती. पण आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Unique Identification Authority of India म्हणजेच UIDAI ने ट्विट करत माहिती दिली की, नियम बदलल्यानंतर आता आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यापूर्वी डॉक्युमेंट लिस्ट चेक करावी लागेल आणि या डॉक्युमेंटच्या मदतीने आधारमध्ये पत्ता अपडेट करता करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज ‘असा’ करा..
▪️ UIDAI च्या ssup.uidai.gov.in/ssup/ या वेबसाईटवर जा.
▪️ वेबसाईटवर उघडल्यावर ‘Proceed to Update Aadhaar’ यावर क्लिक करा.
▪️ त्यानंतर मग तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
▪️ आता ‘Send OTP’ पर्यायावर क्लिक करा.
▪️ रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर ‘Login’ वर क्लिक करा.
▪️ लॉगइन केल्यानंतर तुमचे आधार डिटेल्स स्क्रिनवर दिसतील. यात पत्ता अपडेट करा.
▪️ दिलेल्या 32 कागदपत्रांपैकी ( Upload any of the 32 official documents) एकाची स्कॅन कॉपी अपलोड करुन सबमिट करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews