SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! पैशांची गरज आहे? मग आता एसबीआयचे गोल्ड लोन घेणे झाले आधीपेक्षा सोपे..

भरतातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी सर्वात कमी कागदपत्रांवर गोल्ड लोन देत आहे. एसबीआय (SBI) कमीत कमी 20 हजार आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत Gold Loan देत आहे. एसबीआय गोल्ड लोनवर कमी व्याज आकारत आहे.

उत्पन्नाचे (Income Source) स्थिर स्त्रोत असलेल्या 18 वर्षांपुढील व्यक्ती एसबीआय गोल्ड लोन घेऊ शकतात. पेन्शन चालू असणारे व्यक्ती एसबीआय गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यास उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही.

Advertisement

SBI Gold Loan वर किती व्याज ?

तुम्ही SBI कडून Gold Loan साठी अर्ज करू शकता. SBI सोन्याचे दागिने तसेच नाणी गहाण ठेवून Gold Loan देत आहे. आताच्या कोरोना काळात किंवा इतर गरजेच्या वेळी तात्काळ निधी गोळा करण्याचा सोपा मार्ग म्हणजे Gold Loan असतो. हा सुरक्षित मानला जातो. SBI सध्या किमान 7.50 टक्के व जास्तीत जास्त 29% व्याजदराने गोल्ड लोन देत आहे. तुम्ही तुमच्या YONO खात्यात लॉगिन करून SBI कडून Gold Loan साठी अर्ज करू शकता.

Advertisement

गोल्ड लोन (Gold Loan) साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

▪️ तुमच्या YONO खात्यात (YONO Account) लॉगिन करा. होमपेजवरच्या डाव्या बाजूला मेन्यूवर क्लिक करा. मग लोन (Loan) ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर गोल्ड लोनचा पर्याय निवडा. ॲप्लाय नाऊवर (Apply Now) क्लिक करा.

Advertisement

▪️ ड्रॉपडाऊनमध्ये दिलेल्या सर्व माहीतीसह दागिन्यांचा प्रकार, प्रमाण, कॅरेट आणि निव्वळ वजन इ. तपशील भरा. तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न टाका आणि सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा. तुम्हाला पत्ता पुरावा (Address Proof) आणि ओळख पुरावा (ID Proof) द्यावा लागेल.

सोपी पद्धत: वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी..

Advertisement

▪️ SBI च्या वेबसाईटवरूनही तुम्ही गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता, त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.sbi.co.in/web/personal-banking/loans/gold-loan/personal-gold-loans

▪️ यामध्ये तुम्ही 7208933143 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंवा ‘GOLD’ असा मेसेज करून 7208933145 या नंबरवर पाठवल्यावर तुम्हाला बँकेकडूनच कॉल येईल.

Advertisement

बँकेच्या शाखेत जाऊन Gold Loan साठी अर्ज कसा करायचा?

▪️ तुम्ही SBI शाखेतून Gold Loan साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे असणारे सोन्याचे दागिने शाखेत घेऊन जा. Gold Loan घेण्यासाठी 2 फोटो व केवायसी (आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे) दस्तऐवजांसह एसबीआयच्या शाखेला भेट द्या.

Advertisement

▪️ सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रांवर आणि कर्जाच्या फॉर्मवर स्वाक्षरी करा. यानंतर तुम्हाला Gold Loan मिळेल. एसबीआय ग्राहकांना जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या कालावधीसाठी गोल्ड लोन देत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement