SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जसप्रित बुमराहचा लाॅडर्स कसोटीत राडा, इंग्लंडच्या बटलरला भिडला, टेस्टमध्ये गरमागरमी..!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लाॅर्डस मैदानात आज (ता. 16) चांगलाच राडा पाहायला मिळाला. भारताचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर इंग्लंडला विजय खुणावत होता. मात्र, भारताच्या शेपटाने इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

लाॅडर्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताच्या सगळ्या आशा ऋषभ पंत याच्यावर लागलेल्या होत्या. मात्र, भारताच्या 194 धावा झालेल्या असताना 22 धावांवर तो बाद झाला. मात्र, त्यानंतर मोहम्मद शमी (नाबाद 56) याने जसप्रित बुमराहच्या (नाबाद 34) साथीने किल्ला लढविला.

Advertisement

भारताचा डाव लवकर आटोपत नसल्याचे पाहून इंग्लंडचा संघ रडीचा डाव खेळायला लागला. मैदानात तग धरुन थांबलेल्या बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेजिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला बुमराहने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, पाणी डोक्यावरुन गेल्यावर शांत स्वभावाच्या बुमराहचा पारा चांगलाच चढला.

Advertisement

इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर त्यात आघाडीवर होता. त्यामुळे बुमराह आणि बटलर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. बटलरचा आवाज स्टम्पच्या माइकमध्ये ऐकायला येत होता. हीच गोष्ट बुमराहने मैदानातील पंचांना सांगितली. त्यानंतर पंचांनी दोन्ही खेळाडूंना शांत केले.

शमी आणि बुमराहची विक्रमी भागीदारी
दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी (नाबाद 89) करीत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड मोडला. 1982 मध्ये लॉर्ड्सवर मदन लाल व कपिल देव यांनी 9व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती.

Advertisement

इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य
जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अप्रतिम फलंदाजी केली. शेवटपर्यंत इंग्लंडला त्यांना बाद करता आले नाही. अखेर भारताने आपला डाव 298 धावांवर घोषित केला असून, 272 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चहापानापर्यंत 67 धावांत 4 गडी गमावले होते.

पहिली टेस्ट पावसामुळे अनिर्णित राहिली होती. आता दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोचली आहे. चहापानानंतर बुमराहच्याच बाॅलिंगवर कप्टन ज्यो रुटचा (33) कॅच विराट कोहली याने पकडला. इंग्लंडला ही टेस्ट वाचविण्यासाठी 35 ओव्हर खेळून काढाव्या लागतील. भारताला विजयासाठी 5 विकेट घ्यायच्या आहेत.

Advertisement
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking