SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, ना परीक्षा-ना मुलाखत, पाहा कशी होणार निवड ?

तुम्ही जर दहावी पास झालेला असाल नि नोकरीच्या शोधात असाल, तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची संधी आली आहे. भारतीय रेल्वेत विविध 1664 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

रेल्वेतील या पदांसाठी अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी ना कोणती परीक्षा होईल, ना मुलाखत.. थेट मार्कानुसार ही भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले

Advertisement

रेल्वे रिक्रुटमेंट सेलतर्फे याबाबत अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. रेल्वेतील लेव्हल एकच्या पदांमध्ये भरती प्रक्रियेत अप्रेंटिस करणाऱ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 56900 रुपये वेतन दिले जाणार आहे.

अर्जासाठी मुदत
अप्रेंटिस जाहीर झालेल्या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया 2 ऑगस्टपासून सुरू झाली असून, त्यासाठी अंतिम दिनांक 1 सप्टेंबर 2021 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रयागराज, आग्रा, झाशी विभागांत अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल.

Advertisement

वेबसाईट : पात्र उमेदवार rrcpryj.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. अप्रेंटिस भरतीप्रक्रिया, अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

Advertisement
  • रेल्वेतील अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
  • वेल्डर, वायरमन आणि कारपेंटर पदासाठी आठवी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात.

शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे.  इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement