SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इंग्लंडच्या फास्ट बाॅलरचा अजब दावा..! म्हणतो, ‘टीम इंडियाच जिंकणार टेस्ट सिरीज..’, काय कारणे दिलीत पाहा..?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लाॅर्डस् मैदानावर सुरु असणारा दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. भारताच्या ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ३९१ धावा केल्या. सामन्याचा आजचा चौथा दिवस दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, इंग्लंडसाठी ही मालिका जिंकणे कठीण असून, त्या तुलनेत तगडा भारतीय संघ ही मालिका जिंकू शकतो, असा दावा खुद्द इंग्लंडच्याच गोलंदाजाने केला आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड याने हा दावा केला आहे.

Advertisement

दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सीरिजमधून स्टुअर्ट ब्रॉड बाहेर पडला आहे. मालिकेतून बाहेर पडताच, त्याने इंग्लंड टीमला धोक्याचा इशारा दिलाय. ब्रॉडनं ‘डेली मेल’मध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये या मालिकेविषयी भाष्य केले आहे.

ब्राॅड म्हणतो, की भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जखमी होणारा मी शेवटचा खेळाडू नसेल. इंग्लंडचे आणखी काही बॉलरही या सीरिजमध्ये दुखापतग्रस्त होण्याची भीती ब्रॉडने व्यक्त केली आहे.

Advertisement

“इंग्लिश बॉलर्सना लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमुळे टेस्ट सीरिजची तयारी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. इंग्लंडचे अनेक खेळाडू ‘दी हंड्रेड’ आणि टी-20 सीरिज खेळून टेस्ट टीममध्ये दाखल झाले. 2021 मध्ये बॉलर्सनी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट जास्त खेळलं. त्यामुळे त्यांना टेस्टची तयारी करता आली नाही.”

फास्ट बाॅलर साकिब महमूद याचा अचानक इंग्लंड टीममध्ये समावेश करण्यात आला, पण त्याने मागील दोन महिन्यांत रेड बॉल क्रिकेट खेळलेलं नाही. कोणत्याही तयारीशिवाय त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये उतरवणं अवघड आहे, असे ब्रॉड याने स्पष्ट केले आहे.

Advertisement

तो म्हणतो, की ‘सॅम करन ‘दी हंड्रेड’मध्ये 5 बॉल टाकत होता. आता त्याला दिवसभरात 20 ते 25 ओव्हर्स टाकाव्या लागत आहेत. टीममध्ये पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ख्रिस वोक्स सारख्या खेळाडूंसाठी तर परिस्थिती आणखी बिकट आहे.’

इंग्लंडची डोकेदुखी वाढणार..!
लॉर्ड्स टेस्टपूर्वी जेम्स अँडरसनदेखील पूर्ण फिट नसल्याची बातमी आली होती, तरीही तो लॉर्ड्स टेस्ट खेळतोय. मालिका सुरु होण्यापूर्वीच जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे माघार घेतली होती, तर मानसिक कारण देत बेन स्टोक्स या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला. या यादीत भर पडल्यास इंग्लंडची डोकेदुखी वाढणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement