SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका मिस काॅलवर समजेल जन-धन खात्यातील बॅंक बॅलन्स..! देशातील कोट्यवधी बॅंक खाती झालीत निष्क्रीय..

देशातील प्रत्येक नागरिकाचे बॅंकेत खाते असावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरु केली. त्यानुसार देशातील नागरिकांची बँकांमध्ये जन धन खाती (Jan Dhan) उघडण्यात आली. बँक सुविधापासून वंचित असणाऱ्यांना त्यासाठी प्राधान्य देण्यात आले.

आपल्या खात्यावर नेमका किती बॅलन्स आहे, हे अनेकदा समजत नाही. त्यासाठी अनेकांना बॅंकेत चकरा माराव्या लागतात. खातेदारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता घरबसल्या खात्यातील बॅंक बॅलन्स जाणून घेण्याची सोय करण्यात आली आहे.

Advertisement

बँकेतील जनधन खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरुन फक्त 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर एक मिस काॅल करावा लागेल. लगेच मोबाईलवर तुमच्या खात्यात किती शिल्लक आहे, याचा मेसेज येणार आहे.

अर्थात त्यासाठी तुमचे बँकखाते आधार कार्डाशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.

Advertisement

शिवाय तुम्हाला https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या संकेतस्थळावरही जनधन खात्यातील रक्कम तपासता येते. त्यासाठी तुम्हाला ‘Know your Payment’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमचा अकाऊंट नंबर, कॅप्चा कोड भरला, की तुमचा बॅलन्स दिसू शकेल.

तब्बल 5.82 कोटी खाती निष्क्रिय
दरम्यान, आता जन-धन खात्यांबाबत नवी माहिती समोर येत आहे. या खात्यांपैकी तब्बल 5.82 कोटी खाती निष्क्रिय असून, त्यातील 2.02 कोटी खाती ही महिलांची आहेत. या खात्यांमधून गेल्या अनेक दिवसांत कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे बॅंकांनी ही खाती निष्क्रिय केल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

निष्क्रिय खात्यांची संख्या 5.82 कोटी झाली आहे. मार्च 2020 मध्ये त्याची टक्केवारी 18.08 होती, तर जुलै 2021 मध्ये त्यात घट होऊन ती टक्केवारी 14.02 टक्क्यांवर पोहोचली असल्याचे देशाचे नवे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेतील लेखी उत्तरात सांगितले होते.

दरम्यान, तुम्ही आधार कार्डद्वारे जनधन खाते सुरु करु शकता. मात्र, त्याद्वारे कोणताही व्यवहार न झाल्यास ते बंद होऊ शकतं. ते पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला या खात्यात व्यवहार सुरु ठेवावा लागेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement