SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींविराेधातील गुन्हा रद्द!

राज्यातील अमरावती जिल्ह्यामधील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी मेळघाटमध्ये 25 मार्च रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डीच्या विरोधात दाखल एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द (FIR squashed by Nagpur bench of Bombay High Court) केला आहे.

सविस्तर प्रकरण:

Advertisement

दीपाली चव्हाण यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या माहीतीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळल्या होत्या. त्यासंबंधी त्यांनी चार पानी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. त्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.

अमरावती ग्रामीणमधील धारणी पोलीस ठाण्यामार्फत त्यावेळच्या असलेल्या उपवनसंरक्षक शिवकुमार (Shivkumar) व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी (Sriniwas Reddy) या अधिकाऱ्यांविरुद्ध दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस (Deepali Chavhan Sucide Case) प्रवृत्त करण्याबाबत गुन्हा दाखल (FIR registered by the Dharni police) केला गेला होता. या प्रकरणात या दोघांनाही अटक झाली होती. यानंतर श्रीनिवास रेड्डी यांनी जामिनासाठी व आपल्याविरुद्ध गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मात्र उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. तसेच, सुनावणी सुरू असलेलं हे प्रकरण देखील बंद केलं आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांना न्याय मिळण्याच्या आशेला तडा गेला आणि कुटुंबीय व सहकाऱ्यांना यामुळे मोठा धक्काच बसला आहे.

दीपाली चव्हाण यांचे पती व फिर्यादी राजेश मोहिते काय म्हणाले?

Advertisement

न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर शासनाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध समित्या नेमल्या होत्या. त्यासंबंधी समित्यांचा अहवाल अजूनपर्यंत दाखल झाला नाही व अजूनपर्यंत श्रीनिवास रेड्डींविरुद्ध विभागीय चौकशीसुद्धा सुरू केली नसल्याचा आरोप दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी केला आहे.

दरम्यान, विधिज्ञांशी चर्चा करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे दीपाली चव्हाण यांचे पती व फिर्यादी राजेश मोहिते म्हणाले. दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणात जवळपास सर्वच बयान शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात त्याचा परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement