SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत रंगला ड्रामा; रिषभ पंतवर भडकला विराट कोहली, काय झालं वाचा..

इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या तडाखेबाज खेळीवर लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पाणी फिरवले अन् काही वेळातच 8 फलंदाज फक्त 97 धावांतच आऊट झाले. त्यामुळे भारताचा पहिला डाव 364 धावांत संपुष्टात आला. (India vs England 2nd Test)

भारताच्या 364 धावांचे आव्हान स्वीकारून मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूवर धक्के दिले. मग या सामन्यात एक विराट कोहली, रिषभ पंत आणि सिराज असा तिरंगी ड्रामा रंगलेलाही पाहायला मिळाला. DRSवरून रंगलेल्या या ड्राम्यानंतर भारतीय संघानं स्वतःचं हसू करून घेतलं. पहिल्या दिवसाच्या 3 बाद 276 धावांवरून आज डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात धक्का बसला.

Advertisement

लोकेश राहुलने 250 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार मारून 129 धावा केल्यावर तंबूत परतला. यानंतर अजिंक्य रहाणेला (1) जेम्स अँडरसननं पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं. रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पंत त्याच्या नेहमीच्या आक्रमक अंदाजात होता. पण, मार्क वूडनं त्याला बाद न होण्यासारख्या चेंडूवर माघारी पाठवलं. पंत 37 रन करून झेलबाद झाला. जडेजासोबतची त्याची भागीदारी 49 धावांवर संपली.

जडेजा एका बाजूनं खिंड लढवत होता. इशांत शर्मानं त्याच्यासोबत 26 धावांची भागीदारी करून धावसंख्या वाढवली, परंतु टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात इंग्लंडला फार कष्ट घ्यावे लागले नाही. जडेजा 40 धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात आला. अँडरसननं 62 धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी भारताचे प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Advertisement

Advertisement

इंग्लंडची मैदानावर उतरल्यानंतर निराशाजनक सुरुवात झाली. डॉम सिब्ली (11) आणि हसीब हमीद (0) यांना सिराजनं सलग दोन चेंडूंत बाद केलं. रोरी बर्न्स व कर्णधार जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. त्यांच्या डावातील 23व्या षटकात सिराजच्या चेंडूवर जो रूटसाठी LBWची अपील झाली. मैदानावरील पंचांनी नाबाद निर्णय दिला, पण सिराज DRS घेण्यासाठी विराटकडे आग्रह धरू लागला. यावेळी रिषभ मात्र त्याला तसे करू नकोस असेच सांगत होता. त्यावरून काही काळ विराटचा पारा जरासा चढला होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement