प्रत्येक वर्षी 13 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे (International Lefthanders Day 2021) म्हणून साजरा केला जातो. उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगामध्ये डाव्या हाताने लिहिणाऱ्यांसाठी हा खास दिवस असतो. डावखुऱ्या व्यक्तांनी या उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगात दैनंदिन आयुष्यात कोणत्या अडचणींचा समाना करावा लागतो हे जाणवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आयएनसीचे संस्थापक डॅन आर कॅम्पाबेल यांनी 1976 या वर्षी सर्वात प्रथम लेफ्ट हॅण्डर्स इंटरनॅशन पहिल्यांदा लेफ्ट हॅण्ड दे साजरा केला होता. त्यानंतर दरवर्षी 13 ऑगस्टला (13th August) हा दिवस साजरा केला जातो. जगातील 10 टक्के लोकसंख्या ही डावखुरी आहे(10% of the world’s population is left-handed), म्हणजेच जगातील 90 टक्के लोक उजव्या हाताने लिहितात, असं एका अभ्यासात म्हटलं आहे.
इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लबच्या (Indian Left Handers Club) माहितीनुसार, प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची यादी..
▪️ महात्मा गांधी हे डावखुरे होते.
▪️ मदर तेरेसा डाव्या हाताने लिहित होत्या.
▪️ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डाव्या हाताने लिहितात.
▪️ सचिन तेंडुलकर डावखुरा आहे.
▪️ उद्योजक रतन टाटा हे डावखुरे आहेत.
▪️ अभिनेता अभय देओलसुद्धा डावखुरा आहे.
▪️ गायिका आशा भोसलेही डावखुऱ्या आहेत.
▪️ बॉक्सिंगपटू मेरी कोम डावखुरी आहे.
▪️ बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहर डावखुरा आहे.
▪️ अमिताभ बच्चन डावखुरे आहेत.
▪️ रजनीकांत डाव्या हाताने लिहितात.
▪️ कॉमेडी अभिनेता कपिल शर्माही डावखुरा आहे.
▪️ भारतीय उद्योजक लक्ष्मी मित्तही डावखुरेच आहेत.
▪️ अभिनेत्री आयिशा टाकीयाही डाव्या हातानेच लिहिते.
▪️ अभिनेता अभिषेक बच्चनही डावखुरा आहे.
▪️ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डावखुरी आहे.
▪️ भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री डावखुरे आहेत.
▪️ मुलाखतकार ओपरा विन्फ्रेसुद्धा डावखुरी आहे.
▪️ डिस्नेचे संस्थापन वॉल्ट डिस्नेही डावखुरेच होते.
▪️ गतिशास्त्रावरील निष्कर्ष आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे आयझॅक न्यूटन डावखुरे होते.
▪️ फ्रेंच योद्धा नेपोलियन बोनापार्ट डावखुराच होता.
▪️ चित्रकार पाबलो पिकासो डावखुरा होता.
▪️ अभिनेता टॉम क्रुझ, अभिनेत्री अँजेलिना ज्युली सुद्धा डावखुरे आहेत.
▪️ क्रिकेटपटू अॅलेन बॉर्डर डावखुरे आहेत.
▪️ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही डाव्या हाताने लिहितात.
▪️ अल्बर्ट आइनस्टाइन डावखुरे होते.
▪️ फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गही डावखुराच आहे.
▪️ गायक मायकल जॅक्सनही डावखुराच होता.
▪️ विनोदाचे बादशाह चार्ली चॅम्पलीन डावखुरेच होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews