अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर परतल्यानंतर तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरवण्यास चांगला जोर धरत जवजवळ त्यांनी 60 टक्के भूप्रदेश त्यांच्या अंमलाखाली आणला असल्याचं काही स्थानिकांकडून माहीती आहे. आता कंदहार शहरावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबान संघटनेनं केला आहे. तालिबानने आज शुक्रवारी दावा केला की, त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे.
तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) अफगाणिस्तानातील आणखी काही शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. हेरत, गजनी आणि काला-ए-नाव ही शहरं आपल्या नियंत्रणात असल्याचा दावा तालिबाननं गुरुवारी (12 ऑगस्ट) केला. गझनीमध्ये या अतिरेक्यांनी पांढरे झेंडे फडकवल्याचं समजतंय. दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराबाहेरील लष्करी आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे.
तालिबानच्या प्रवक्त्यानं घोषणा केली केली की, “कंदहार आता पूर्णपणे आम्ही जिंकला आहे.” अफगाणिस्तानवर तालिबानची पकड हळूहळू मजबूत होत आहे. तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल असेल. तालिबान काबूलपासून अवघ्या 130 किमी अंतरावर आहेत. अशाप्रकारे, दहशतवादी संघटनेने आतापर्यंत 12 प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत.
कंदहार शहर ‘इतकं’ महत्त्वाचं का वाटतं?
तालिबानचा जन्म कंदहारमध्येच झाला आणि येथेच तालिबानने स्वतःला बळकट केलं. रणनीती आखण्यासाठी, कंदहार शहर एका महत्त्वाच्या व्यापारी रस्त्यावर असल्यानं हे महत्वाचं शहर आहे. या शहरावर कब्जा करणं म्हणजे तालिबानसाठी मोठं यश ठरेल.
तालिबानने अफगाणिस्तानातील कंदहार शहराचा बाहेरील भाग काबीज केला होता. बुधवारी तालिबान्यांनी कंदहारच्या मध्यवर्ती तुरूंगावर हल्ला केला व आता त्यांनी शहराच्या सरळ मध्यवर्ती भागात हल्ले करून ते शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचले आहेत, अशी माहीती आहे.
दरम्यान, अफगाणी राष्ट्रीय संरक्षण दलांकडे लढाईत प्रत्युत्तर देण्यासाठी युद्धसाहित्य, संख्याबळ आणि प्रशिक्षण आहे. त्यांना जे आवश्यक आहे, ते त्यांच्याजवळ आहे. आता त्यांना लढण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन सॉकी यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील या भयानक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कतारची राजधानी दोहामध्ये बैठकीचे सत्र सुरु आहे. यामध्ये चीन, अमेरिका, पाकिस्तान, रशिया या देशांचा समावेश असून त्यामध्ये भारतालाही उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews