SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर, उद्यापासूनच ऑनलाईन रजिस्टेशन सुरु, कसे होणार प्रवेश जाणून घेण्यासाठी वाचा..?

मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर केले. त्यानुसार आता उद्या (ता. 14) सकाळी 11 वाजेपासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचा लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करावा लागेल.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच नागपूर, नाशिक व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने होणार आहेत. त्याचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले, तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

Advertisement

दरम्यान, यंदा फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांना उद्यापासूनच (ता. 14) ऑनलाईन अर्जाचा भाग-1 भरायचा आहे, तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी 27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

संकेतस्थळ – https://11thadmission.org.in

ईमेल[email protected]

Advertisement

कशी होणार अकरावीची प्रवेश प्रक्रिया..?
– अकरावी प्रवेश प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू होणार. 14 ते 22 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज भाग-1 भरायचा आहे.

– विद्यार्थ्यांनी भरलेला फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी जवळच्या कॉलेज वा मार्गदर्शक केंद्रावर जावे.
17 ते 22 ऑगस्टदरम्यान अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे. त्यात कॉलेजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत.

– 24 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार. अर्जात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिला जाणार.
– 25 ऑगस्टला अंतिम सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर होणार. 27 ऑगस्टला पहिली गुणवत्तायादी जाहीर होणार.

Advertisement

– पहिल्या यादीनंतर कॉलेजचे ‘कट ऑफ’ संकेतस्थळवर जाहीर होणार. 27 ऑगस्टला मिळालेले पसंतीचे  कॉलेज निश्चित करावे लागणार, अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल.
– 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement