SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका चार्जिंगमध्ये 240 किलोमीटरची रनिंग..! स्वातंत्र्यदिनी ‘सिम्पल वन’ ई-स्कूटरचे लाॅंचिंग, 1947 रुपयांत बुकिंग..!

भारतात येत्या स्वातंत्र्यदिनी (ता. 15 ऑगस्ट) दोन ईलेक्ट्रीक स्कूटरची ‘ग्रॅंड एन्ट्री’ होणार आहे. ‘सिम्पल वन’ (Simple One) आणि ‘ओला इलेक्ट्रीक’ (Ola Electric) या दोन स्कूटरमध्ये थेट मुकाबला होणार आहे.

सध्या ‘ओला’ स्कूटरला जबरदस्त प्रतिसाद मिळत असला, तरी ‘सिंपल एनर्जी’ स्कूटरदेखील ‘ओला’च्या तुलनेत कुठेही कमी नसल्याचे दिसते. ‘सिंपल वन एनर्जी इलेक्ट्रीक स्कूटर’ (Simple One Electric Scooter) भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. 15 ऑगस्टपासून या स्कूटरचे बुकिंग सुरु होणार आहे.

Advertisement

‘सिंपल वन स्कूटर’ भारतातील सर्वाधिक रेंजची स्कूटर असणार आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 240 किमी धावू शकते, असे दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ही स्कूटर शहरांसह गावांमध्येही उपयुक्त ठरणार आहे.

सुरुवातीला ‘ओला स्कूटर’ची रेंज 240 किमी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, ‘ओला’ची स्कूटर 150 किमीच रेंज देण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा 90 किमी जास्त रेंज सिंपल वन स्कूटर देत असल्याचा दावा करण्यात आलाय.

Advertisement

‘सिम्पल वन’ स्कूटरची वैशिष्ट्ये

  • ‘सिम्पल वन’ स्कूटरमध्ये 4.8 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. मोठा बॅटरी बॅकअप असल्याने स्कूटर वारंवार चार्ज करण्याची गरज नाही.
  • इके मोडवर ही स्कूटर 240 किमी चालेल. मात्र, ओव्हरलोडिंग न करता, कमी वेगाने चालविली तरच ही रेंज मिळणार आहे, नाही तर रेंज कमी होऊ शकते.
  • ही स्कूटर 3.6 सेकंदांत 50 किमी प्रति तास वेग पकडते. स्कूटरचा टॉप स्पीड 100 किमी प्रति तास असेल.

स्कूटरची किंमत
‘सिम्पल वन’ स्कूटरची किंमत 1 ते 1.20 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. मात्र, सबसिडीमुळे ती आणखी कमी होईल. सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच होणार असून, याच दिवसापासून फक्त  1,947 रुपयांत ती बूक करता येणार आहे.

Advertisement

कोणत्या राज्यांत मिळणार?
सुरुवातीला ‘सिंपल एनर्जी’ स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहीतच भारतात लाँच होणार होती. मात्र, त्याच वेळी कोरोनाची दुसरी लाट आल्याने हे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते.

आता ही ई-स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगना, केरळ, महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये विकली जाणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर या शहरात ही स्कूटर मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement