SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मीराबाई चानूसोबतच्या भेटीनंतर सलमान खान ट्रोल, नेटिझन्सना खटकली एक गोष्ट, नेमकं काय झालं..?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने पहिले पदक जिंकले. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडूंनी मीराबाईचे कौतुक केले. आता रौप्यपदक विजेत्या मीराबाईच्या जीवनावर एक मणिपुरी चित्रपटही बनणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची नुकतीच मीराबाई चानू हिने भेट घेतली. या भेटीचा फोटो सलमानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. मात्र, या फोटोत नेटिझन्सना एक गोष्ट खटकली, ज्याच्याशी सलमानचे जूने नाते आहे. त्यावरून नेटिझन्सनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Advertisement

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत सलमान खानसोबत मीराबाई चानू आनंदी मूडमध्ये दिसत आहे. फोटोखाली सलमानने म्हटलेय, की रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूला शुभेच्छा.. तुझ्यासोबत खूप चांगली भेट झाली, तुला सर्व काळासाठी खूप खूप शुभेच्छा…!

Advertisement

आता यात खटकणारे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. तर या फोटोत सलमानच्या गळ्यात मणिपुरी स्कार्फ दिसतोय. मीराबाईने तो सलमानला गिफ्ट केला असण्याची शक्यता आहे. या स्कार्फवर काळ्या हरणाचे चित्र दिसत आहे.

काळे हरिण नि सलमानचे जूने ‘नाते’ सर्वांनाच चांगले माहिती आहे. त्यामुळे सलमानला थेट जेलवारी करण्याची वेळ आली होती. नेमकं स्कार्फवर काळे हरिण पाहून नेटिझन्सनी वेगवेगळ्या कमेंट्स करताना सलमानवर निशाणा साधला.

Advertisement

एका युझरने लिहिले, की ‘भाईच्या शॉलवर हरीण..’, तर दुसरा म्हणतो, ‘या फोटोमध्ये काय पाहिले..?’ तिसऱ्याने लिहिले, की ‘आता यावर खूप मिम्स बनणार..’, एका युझरने असे म्हटले, की ‘हरिण डेव्हिलच्या मागे. डेव्हिल हरणाच्या मागे… टू मच फन…!’

२००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने वेटलिप्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर 21 वर्षांचा दुष्काळ संपविताना मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिले. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement