SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात होणार ‘इतकी’ वाढ..!

कोरोनाच्या प्रदूर्भामुळे टाळेबंदीच्या काळात केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी (PSU Banks Employees) आनंदाची बातमी आली आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रामधील ज्या बँका आहेत, त्या बँकांच्या 8 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) वाढ केली आहे.

Advertisement

म्हणून आता सरकारी बँक कर्मचाऱ्यांना यंदाच्या ऑगस्ट महिन्यापासून पगारवाढ (Salary Hike) होण्याची चिन्ह आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2021 या महिन्यांसाठी वाढ करण्यात आली आहे.

म्हणजेच महागाई भत्त्यात ही वाढ फक्त 3 महिन्यांसाठी असणार आहे. ऑल इंडिया एव्हरेज कंज्‍यूमर प्राइस इंडेक्‍सच्या (AIACPI) आकडेवारीच्या आधारे हा निर्णय घेतला गेला आहे.

Advertisement

विविध श्रेणींच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेगवेगळे :

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वेगवेगळ्या श्रेणीत आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात DA मध्ये 2.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात त्यात डीए आता 27.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याआधी महागाई भत्ता 25.69 टक्के होता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement