SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हळहळ व्यक्त करणारी घटना: आठवी पास मुन्नाने बनविलेल्या हेलिकॉप्टरमुळेच झाला त्याचा मृत्यू!

जगात कित्येक अशा कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला माहीतच आहे की, अनेक आश्चर्यचकित करणारे, अचानक लागलेले शोध आपल्या कानी पडत असतात. असेच कष्ट करून आठवीपर्यंत शिक्षण घेऊन एका तरुणाने एक हेलिकॉप्टर तयार केले होते.

हेलिकॉप्टरचा पंखा तुटला आणि मग…

Advertisement

तयार झालेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करत असताना सरावादरम्यान त्याचा पंखा तुटला आणि उड्डाण भरायच्या आधीच ते हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. अपघाताची घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरच्या झालेल्या अपघातात संबंधित शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिमचा जागीच मृत्यू झाला आहे. मुन्ना हा 24 वर्षांचा होता. तो यमतमाळमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगीचा रहिवाशी होता.

पत्राकारागीर असलेल्या शेख इस्माईलने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःच हेलिकॉप्टर बनविले. 15 ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडविणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री त्याचा सराव सुरू होता. सरावादरम्यान हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूला असणारा पंखा तुटला आणि तो मुख्य पंख्यावर येऊन अचानक आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळताच त्याने जागीच प्राण सोडले.

Advertisement

शेख इस्माईल पत्राकारागीर असल्यामुळे लहान-लहान कपाटं, कुलर अशा काही वस्तू बनवायचा. मुन्नाचे शिक्षण केवळ 8वी पर्यंतच झाले होते. हेलिकॉप्टर बनविण्याची आयडिया आली, मग हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक ना एक गरजेचा सुटा भाग तो तयार करत राहिला. तब्बल दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न साकार होणार होते. मात्र मंगळवारी रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घ्यायला सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन 750 अ‍ॅम्पियरचे होते.

दरम्यान सराव सुरू असताना हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला. आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माईलने डोळे मिटले. यवतमाळच्या या मुन्नाचे हेलिकॉप्टर बनवून आकाशात उडण्याचे स्वप्न या अपघाताने धुळीस मिळाले. स्थानिकांनी या घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement