बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेक वर्षांपासून मनोरंजनामध्ये बॉलिवूड पुढे राहिले आहे. सध्या एकापेक्षा एक सरस चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होत आहेत. आता अजय देवगणच्या ‘भुज’पासून सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’पर्यंत असे येणाऱ्या काळात अनेक रिअर लाईफ चित्रपट रिलीज होणार आहेत.
अजय देवगणचा ‘भुज’- द प्राइड ऑफ इंडिया’: अनेक जबरदस्त, मनोरंजनात्मक भूमिका करणाऱ्या अजय देवगणचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’चा (Bhuj: The Pride of India) ट्रेलर 12 जुलै 2021 ला लाँच झाला. हा चित्रपट 12 ऑगस्ट म्हणजेच येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अभिनेता अजय देवगण या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे.
अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’: अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. 2019 साली बॉलिवूडचा खिलाडी (Akshay Kumar) अशी ओळख असणारा अक्षय कुमारच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे.
कंगना रनौतचा थलाइवा: तनु वेड्स मनू सारख्या चित्रपटापासून अधिक लोकप्रिय झालेली कंगना आपल्या ‘थलाइवा’ (Thalaiva) या चित्रपटातही झळकणार आहे. यंदाच्या वर्षी हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह: सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा शेरशाह हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. याआधी 25 जुलै रोजी करण जोहर निर्मित ‘शेरशाह’ (Shershah on Amazon Prime Video) चित्रपटाचा ट्रेलर मद्रासमध्ये प्रदर्शित झाला होता. शेरशाह कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित आहे.
रणवीर सिंगचा 83: 1983 क्रिकेट विश्वचषकावर आधारित रणवीर सिंगचा ’83’ (83 Movie) हा चित्रपट बऱ्याच काळापासून रिलीजची वाट पाहत आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) रिलीज होण्याऐवजी मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहिली जात होती. आता थिएटर उघडल्यानंतर चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येऊ शकेल.
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’: गेल्या काही महिन्यांत चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तयारी जोरात सुरू आहे. काही दिवसांतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय देवगणचा मैदान: अजय देवगणचा आगामी चित्रपट मैदान (Maidan Movie) 1952-1962 दरम्यानच्या भारताच्या फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कथा सांगणार आहे. यामध्ये अजय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रियामणी आणि गजराज राव देखील दिसणार आहेत आणि 15 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews