SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा लोगो बदलणार, ‘या’ SUV पासून होणार सुरुवात!

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) आपला नवा लोगो जारी केला आहे. Mahindra ने आपल्या नव्या लोगोचा यू-ट्यूबवर व्हिडीओ जारी केला आहे. (Mahindra reveals new logo) हा लोगो पहिल्यांदा कंपनीच्या आगामी XUV700 गाडीवर दिसेल, असं कंपनीने म्हटलं आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचा आताचा लोगो जो ‘Road Ahead’ आहे, तो कंपनीने 2000 साली लाँच केला होता. तो लोगो पहिल्यांदा 2002 मध्ये स्कॉर्पिओ या गाडीवर पाहिला गेला होता. तरी जुने लोगो कंपनीच्या ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांवर असतील. असे असले तरी कंपनीच्या कार व्यवसायाची एक वेगळी इमेज बनेल.

Advertisement

काय-काय बदल होणार?

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची भारतात 832 शहरांमध्ये आउटलेट आहेत. ही कंपनी कार व्यवसायाचा लोगो बदलण्यासोबतच व्यवसायही विस्तारत आहे. त्यामुळे त्याच्या स्टोअर्स, डीलरशिपचाही मेकओव्हर होणार आहे. या परिस्थितीत कंपनीने केवळ आपला लोगोच बदलला नाही तर या लोगोद्वारे आपल्या ब्रँड इमेजला रिफ्रेश लूकही देण्याचं काम करत आहे.

Advertisement

आता यापुढे कंपनीचा पूर्णपणे फोकस एसयूव्ही सेगमेंटवर आहे, तो सुद्धा 4 बाय 4 ड्राइव्ह मोडवर, कारण ब्रँड फिल्ममध्ये जवळजवळ सगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत महिंद्रा कंपनी तयारीनिशी उभी असल्याचं दिसतं.

महिंद्रा अँड महिंद्राचा नवीन लोगो ग्रे-मेटॅलिक कलर आहे. हा बऱ्यापैकी प्रीमियम लूक देतो. असंही म्हटलं जात आहे की, एसयूव्ही सेगमेंटमधील महिंद्राची आता Kia Motors, MG Motors, Hyundai Motors अशा आंतरराष्ट्रीय ब्रँडशी चांगलीच टक्कर होणार आहे.

Advertisement

महिंद्रामध्ये मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस यांचा नवीन लोगोची डिझाईन करण्यात मोलाचा वाटा आहे. या नवीन लोगोवरून दिसतं की, कंपनीचे लक्ष एसयूव्ही बाजारावर आहे, ज्यासाठी कंपनी नवीन ब्रँड स्ट्रॅटर्जी स्वीकारत आहे. नवीन लोगो केवळ स्पोर्ट युटिलिटी वाहनांसाठी म्हणजेच एसयूव्हीसाठी वापरला जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या व्हिडीओला नसरुद्दीन शहा यांचा आवाज आहे. शंकर एहसान लॉय यांनी म्युझिक दिले आहे. नसरुद्दीन शहा या नव्या लोगोची कहाणी सांगत आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement