SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना मिळणार कृषी योजनांचा लाभ, ‘महा-डीबीटी’ ॲपद्वारे घरूनच करता येणार अर्ज..!

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला शेतीविषयक सर्व सरकारी योजनांचा घरबसल्या लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ‘महा-डीबीटी’ (MahaDBT Farmer) हे मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे. या ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी (Farm Schemes) आपल्या मोबाईलवरून घरबसल्या अर्ज करता येणार असल्याची माहीती राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.

‘MahaDBT Farmer’ या ॲपमुळे योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल, तर तुम्हाला आवश्‍यक असे सर्व कागदपत्रं आता तुमच्या ॲंड्रॉईड मोबाईलवरूनच अपलोड करता येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या या ॲपचा वापर करण्याचे आवाहन धीरजकुमार यांनी केले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहीती घ्यावी लागेल. या संकेतस्थळावर गेल्यावर तिथे ‘शेतकरी योजना’ असा एक पर्याय दिसेल. त्या पर्यायावर जाऊन शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठीचा अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांना फक्त एका अर्जाच्या माध्यमातून सर्व योजनांचा लाभ घेता येतो, असा उद्देशच हे ॲप्लिकेशन तयार करताना होता. शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून ते संबंधित योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली गेली आहे. शेतकरी त्यांच्या आवडीच्या शेती योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांची सोडतीद्वारे संबंधित योजनेच्या लाभासाठी निवड निश्चित होते मग शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रे छानणीकरता या पोर्टलवर अपलोड करावी लागतात. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सामाजिक अंतर ठेवण्याची गरज असल्याने सामुदायिक सेवा केंद्रे व कृषी कार्यालयात जाऊन कागदपत्रे अपलोड करताना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हे ॲप तयार केले आहे.

ॲप ‘असं’ करा डाऊनलोड:

Advertisement

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईलमधील ‘गुगल प्ले स्टोअर’वर जाऊन ‘महाडिबीटी फार्मर’ (MahaDBT Farmer) हे ॲप डाऊनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करून ॲप इंस्टॉल करा👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.mahadbtagri

हे ॲप उघडल्यावर वापरकर्त्यांना आधार क्रमांक व इतर माहीती लागणार आहे. गावातील अनेक लाभार्थी हे एकाच मोबाईलवरून ही कागदपत्रे अपलोड करु शकतात, असेही धीरजकुमार यांनी म्हटले आहे.

Advertisement

कागदपत्रं अपलोड करताना..

शेतकऱ्यांना MahaDBT ॲपच्या माध्यमातून कागदपत्रं अपलोड करताना जर काही तांत्रिक समस्या येऊ लागली, तर जवळच्या सामुदायिक सेवा केंद्राची मदत घेता येते. यासोबतच कृषी विभागामार्फत ही अडचण सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकरी या कक्षासोबत ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकतात. असे आवाहन कृषी आयुक्तांनी केलं आहे.

Advertisement

▪️ ई-मेल: [email protected]

▪️ दूरध्वनी क्रमांक: 022-49150800

Advertisement