SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल; चेंडू स्टँडमध्ये गेला, तर काय होणार, जाणून घ्या..

आयपीएलच्या 14 व्या हंगामात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील (IPL 2021 Phase 2) उर्वरित 31 सामन्यांपैकी सर्वाधिक 13 सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. यात शारजाहमध्ये 10 आणि अबुधाबीमध्ये 8 सामने होणार आहेत.

आयपीएलच्या 14 व्या सीझनमधील दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून (IPL 2021 to resume from September 19) ते 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. यात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. याआधीच्या टप्प्यात अनेक खेळाडू आणि कर्मचारी यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता IPL पुन्हा सुरू होण्यापूर्वी, आयपीएलचे सर्व सामने सुरळीत पार पडावे यासाठी BCCI ने कडक नियम लागू केल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement

एका अहवालानुसार IPL 2021 चे बदललेले नियम :

▪️ यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेंडू स्टँडमध्ये गेला तर त्याच्या जागी दुसरा चेंडू वापरला जाणार आहे. यामुळे कोरोनाविषयक खबरदारी बाळगली गेली आहे.

Advertisement

▪️ चेंडूची पकड मजबूत होण्यासाठी, वळविण्यासाठी गोलंदाज चेंडूला थुंकी लावतात, ती आता लावता येणार नाही. जेणेकरून कोरोना संसर्गाची शक्यता कमी होईल.
समजा, जर तसं काही घडलंच तर अंपायर इशारा देऊन दंड म्हणून प्रतिस्पर्धी टीमला 5 धावा देतील.

▪️ UAE ला जाण्याच्या आधी, खेळाडू व कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित RTPCR चाचणी करून घ्यावी लागेल. ही चाचणी 72 तासांपूर्वी करणं गरजेचं आहे, असं सांगितलं आहे.

Advertisement

▪️ आरटी-पीसीआर चाचणी केलेल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे. एखाद्या खेळाडूला आवश्यक कारण असेल, तरच बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

▪️खेळाडूंना व कर्मचारी यांना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बायोबबलमध्ये (Bio-Bubble) पुन्हा परतण्यासाठी 6 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. यामध्ये त्यांची दर दुसऱ्या दिवसाला कोरोना चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरच खेळाडूंना स्पर्धेसाठी आवश्यक गोष्टींसाठी परवानगी दिली जाईल व ते आयपीएलसाठी पात्र ठरतील.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement