SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लष्करातील शिपाई रस्तालूट करताना पकडला..! देशसेवा सोडून नशिबी आली जेलवारी, पाहा नेमकं काय घडलं..?

तो लष्करात शिपाई.. चांगल्या पगाराची नोकरी.! देशसेवेच्या कामात असल्याने गावातही त्याला चांगला मान होता. गावकरी त्याच्याकडे आदराने पाहत. घरी-दारी सगळं काही चांगले चाललेले; पण ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ सुचली…

गावी सुटीवर आल्यावर काही वाया गेलेल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने त्याने चक्क लोकांना लुटण्याचा धंदा सुरु केला. मात्र, काेणताही गुन्हा जास्त दिवस लपून राहत नाही. कधीतरी तो पुढे येतोच. तसाच त्याचा काळा चेहराही लोकांसमोर आला.

Advertisement

पोलिसांनी पकडले. सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानास आता पोलिस संरक्षणात ठेवलेय. आता गावात ना ती पत राहिली, ना प्रतिष्ठा..! सगळं धुळीस मिळाले. चुकीची संगत नडली. एका चांगल्या तरुणाच्या आयुष्याची माती झाली..!

नेमकं काय घडलं..?
अमरावती जिल्ह्यातील जसापूर येथील हा आरोपी सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहे. काश्मिरला त्याची पोस्टिंग होती. काही दिवसांपूर्वी सुटी घेऊन तो विदर्भात आपल्या गावी जसापूर येथे आला. दारुड्या मित्रांच्या संगतीत वाहत गेला.

Advertisement

विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. पोलिस असल्याचे सांगून हा आरोपी व त्याचे दोन साथीदार पर्यटकांना अडवित. दमदाटी करुन त्यांच्याकडून पैसे लुबाडत. त्यावरच त्यांची मौजमजा चालली होती.

चिखलदराकडे जाताना चांदूरबाजार तहसील हद्दीत हे जसापूर गाव आहे. याच गावातील हे तीन तरुण होते. दारुच्या नशेत मडकी गावाजवळ ते पर्यटकांना लुटत होते. त्यांनी अनेक पर्यटकांची वाहने थांबवून त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुलीही केली.

Advertisement

अखेर आरोपींच्या या कृत्याची माहिती पोलिसांना लागली. एका पर्यटकाने थेट चिखलदरा पोलिस ठाण्यात या आरोपींची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पर्यटकांना लुटताना पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं.

पोलिसांच्या चौकशीत या आरोपीने आपण सैन्यात शिपाई पदावर असल्याचे सांगितले. सुरवातीला पोलिसांचाही त्यावर विश्वास बसला नाही. त्याने दिलेली माहिती खरी आहे की नाही, याची पोलिसांनी शहानिशा केली असता, ती खरी निघाली..!

Advertisement

सैन्यात चांगल्या पदावर, चांगल्या पगाराची नोकरी असतानाही तो करीत असलेले काम पाहून पोलिसही चक्रावून गेले. लष्करी जवानाच्या या कृत्याने अमरावतीकरांची मान शरमेने खाली गेली आहे. चांगल्या कुटुंबातील तरुण चुकीच्या संगतीने वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटत आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement