SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; निवड झाल्यावर उमेदवारांचा 48 तासांत गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा

राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या दृष्टीने (decriminalising politics) सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्वच राजकीय पक्षांना उमेदवाराची निवड निश्चित झाल्यानंतर पुढील 48 तासांत त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि बी आर गवई यांच्या खंडपीठाने यासंबंधी 13 फेब्रुवारी 2020 मध्ये देण्यात आलेल्या आदेशात बदल केलेत.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित आदेशात होता. त्यात उमेदवारांची निवड झाल्यानंतर 48 तासांच्या आत किंवा किमान उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन आठवडे आधी स्वत:बद्दलची सविस्तर माहिती अपलोड करावी, असे आदेशात म्हटले होते.

उमेदवारांची निवड झाल्यावर 72 तासांच्या आत अनुपालन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आपल्या उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांची माहिती जाहीर न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

Advertisement

तसेच, राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हे राजकीय पक्ष जाहीर करत नाहीत, असा त्यांचा मुद्दा होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या फेब्रवारी 2020 च्या आदेशाचे राजकीय पक्ष पालन करत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात अवमानना केल्याची कारवाई करावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी होती. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement