SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

श्रावणात नाॅनव्हेज का खात नाहीत..? त्यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेण्यासाठी वाचा..!

श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना. हिंदू संस्कृतीत श्रावणाला वेगळं महत्त्व आहे. या श्रावणास आजपासून सुरुवात झाली.

श्रावण आजपासून सुरु होणार असल्याने काल (रविवारी) गटारी अमावास्या जोरात साजरी झाली. पुढील दोन-अडिच महिने तरी नाॅनव्हेज (Non veg) खाता येणार नसल्याने अनेकांनी काल (रविवारी) दिवसभर चिकन-मटनावर आडवा हात मारला.

Advertisement

श्रावणात अनेक सणवार मोठ्या थाटात साजरे होतात. श्रावण महिना सुरु झाला, की मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. अर्थात आता काही जण या प्रथा-परंपरेलाही छेद देत असतात. परंतु प्रत्येक परंपरेला विज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

श्रावणात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. फक्त ती समाजाच्या श्रद्धेशी जोडण्यात आली आहेत. तशीच श्रावणात मांसाहार न करण्यामागेही काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत. ही कारणे कोणती आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

श्रावणात मांसाहार न करण्यामागील कारणे
– सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणात झालेला बदल आणि प्राण्यांचा असणारा हा प्रजनन काळ. पावसाळ्यात वातावरणात ओलसर व दमटपणा वाढलेला असतो. ढगाळ वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतो. असं मांस खाण्यात आल्यास अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

– पावसाळ्यात आपली पचनशक्ती काहीसी मंदावलेली असते. अशा वेळी मांस, मटन, मासे हे पदार्थ पचायला जड जातात. वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो, म्हणून श्रावणात व खासकरुन पावसाळ्यात शक्यतो नॉन व्हेज पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

– पावासाळ्यात शरिराचे तापमान वाढणे धोकादायक ठरु शकते. हृदयासंबंधी आजार उद्भवू शकतात. शारीरिक दुखणी वाढतात. त्यामुळे या काळात मद्यपान करणेही वर्ज्य मानले जाते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

 

Advertisement