SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर भारत सरकारने केले ‘इतके’ कोटी खर्च; जाणून घ्या..

भारताचा ‘गोल्डन बॉय’ (Gold Medalist) भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक (Olympic gold winner Neeraj Chopra) जिंकून दिले. यानंतर देशात नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.

ऑलिम्पिकमध्ये याआधी भारताने कधीच सात पदकांची कमाई केली नव्हती. एवढंच नव्हे तर नीरज चोप्राचं हे सुवर्णपदक ॲथलेटिक्समध्ये भारताचे पहिलेच पदक असल्याने ही विशेष गोष्ट आहे. देशातील 1.38 अब्ज लोकांची मने जिंकून भारताची मान आज उंचावली आहे.

Advertisement

भारत सरकारकडून नीरजला मिळालेली मदत:

▪️ भारतात जेव्हा संपूर्ण लॉकडाऊन होते, देश कोरोना संकटाला सामोरे जात होता, त्यावेळी नीरजसाठी युरोपमधील प्रशिक्षण व स्पर्धांसाठी व्हिसा आणि पत्र

Advertisement

▪️आवश्यक क्रीडा उपकरणे आणि त्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत

▪️बायो-मेकॅनिस्ट तज्ज्ञाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात स्वतंत्र निधी वाटप

Advertisement

▪️ टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या 26 आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आर्थिक मदत

कोटींची मदत:

Advertisement

1) परदेशी प्रशिक्षण आणि स्पर्धा – 4, कोटी 85 लाख 39 हजार 639 रुपये
2) प्रशिक्षकांचा पगार – 1 कोटी 22 लाख 24 हजार 880 रुपये
3) उपकरणे (चार भाला) – 4 कोटी 35 हजार रुपये
4) एकूण – 6 कोटी 11 लाख 99 हजार 518 रुपये

‘असा’ झाला टोकियो ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास…

Advertisement

2016च्या जागतिक अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळविल्यावर नीरज चोप्रा फोकसमध्ये आला. ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एखाद्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. मग 2017 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2018 कॉमनवेल्थ गेम्स, 2018 मध्ये एशियन गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक जिंकत आपल्या विजयाची घोडदौड चालूच ठेवली.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एक महिन्यानंतर नीरजच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मे 2019 मध्ये शस्त्रक्रिया केल्याने तो मैदानापासून बरेच दिवस लांब राहिला. मग जानेवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील पोटचेफस्ट्रूमच्या स्पर्धेत 87.86 मीटर भालाफेक करत त्याने यशस्वी पुनरागमन केले आणि टोकियो ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics) तिकीटही पक्के केले.

Advertisement

भारत सरकारने जुलै 2019 पासून नीरजच्या ट्रेनिंग आणि परदेशी प्रशिक्षकाची व्यवस्था केली. दुखापतीतून सावरल्यानंतर नीरजने परदेशी प्रशिक्षक डॉ. क्लाऊस बार्ट्रोनिट्झ यांच्या हाताखाली भालाफेकीचे (javelin throw) धडे गिरवले. ऑलिम्पिकला जाण्याआधी शेवटच्या टप्प्यात त्याने 1097 दिवसांचे एनआयएस पटियालामध्ये प्रशिक्षण घेतले.

Advertisement