SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हॉटेल, धार्मिक स्थळं, मॉल्स सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले..

राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री सोशल मीडियावर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्याबरोबरच मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळांबाबत निर्बंधांमध्ये शिथिलता लवकरच देण्याची घोषणा केली.

आज टास्क फोर्सची बैठक:

Advertisement

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा दिला असता, तरी देखील अजूनही हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक बोलावली असून आज टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीचा योग्य तो आढावा घेतल्यानंतर कोरोनाविषयक कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाऊ शकते.

Advertisement

कोरोनामुळे परिस्थिती जर आटोक्यात असेल, तर तसा त्यासंदर्भात शिथिलतेविषयी निर्णय जाहीर केला जाईल. त्यानंतर धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेऊ. यामध्ये यात 8 ते 10 दिवस जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतेच..!

Advertisement

मुख्यमंत्री म्हणाले, “पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी काळजी अत्यंत गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

वाढत्या रुग्णांमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांत कोरोना नियम शिथिल होणार नसल्याचा इशाराच जणू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच आजपासून काही ठिकाणी शिथिलता देण्याचाही राज्य सरकारचा विचार चालू असल्याचं, ते म्हणाले.

Advertisement

कोरोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर कोरोनाविषयक निर्बंध हे पाळावेच लागणार आहेत. राज्यात जोपर्यंत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत लसीकरण होत नाही, तो पर्यंत प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement