SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा..! स्कूटरला 3, बाईकला 5, तर कारला मिळणार फक्त 10 लिटर इंधन, पाहा कशामुळे आलीय ही वेळ..?

आसाम व मिझोराममध्ये सीमावादातून २६ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे पोलिस व सुरक्षा दलात गोळीबार झाला. त्यात काही पोलिसांचा मृत्यू झाला. या दोन राज्यातील वाद अजूनही धुमसत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात FIR दाखल केलाय. त्यांच्याविरोधात झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कटाअंतर्गत, तसेच २०० अज्ञात पोलिसांविरोधातही मिझोराममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आसामसोबतच्या संघर्षानंतर मिझोराममधील नॅशनल हायवे ३०६ बंद झाला. त्यामुळे मिझोरामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मिझोराम सरकारने राज्यातील प्रत्येक वाहनास ठराविकच इंधन देण्याचं निश्चित केलंय. सरकारी निर्बंधाप्रमाणेच वाहनांना पेट्रोल-डिझेल दिलं जाणार आहे.

वाहनांना मिळणार असं इंधन
मिझोराममध्ये आता १२, ८ आणि ६ चाकी वाहनांना जास्तीत जास्त ५० लिटर इंधन दिलं जातं. चारचाकी मोठ्या वाहनांना २० लिटर, कारला 10 लिटर, बाईकला ५, तर स्कूटरला फक्त ३ लिटर इंधन देण्यात येणार आहे. इंधनासोबतच मिझोराममध्ये अन्नासह इतर जीवनाश्यक वस्तूंवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे.

Advertisement

पेट्रोलपंपावर येणाऱ्या वाहनांनाच इंधन द्यावं, कुणालाही कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये. पेट्रोलच्या काळ्याबाजारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करावा, पेट्रोलपंपाकडे किती इंधन साठा शिल्लक आहे, याचा तपशिल रोज सरकारला देण्याचे आदेश मिझोराम सरकारने पेट्रोलपंपांना दिले आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement