SpreadIt News | Digital Newspaper

‘या’ कारणांमुळे राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड..! ‘हा’ फोटो केला होता पोस्ट, नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा..

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ट्विटरने मोठा दणका दिला आहे. चक्क त्यांचे ट्विटर अकाऊंटस् सस्पेंड करण्यात आलेय. तसेच त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, नेमकं असं काय झालं, राहुल गांधी कशामुळे अडचणीत सापडले, हे जाणून घेऊ या..

दिल्लीतील नांगल येथील एका अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला. पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गेले होते. तेथे जाऊन त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Advertisement

पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी मुलीच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. मात्र, त्याला भाजपने मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला. पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर केल्याबद्दल या फोटोवर आक्षेप घेत विनीत जिंदल या वकिलाने थेट दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, राहुल यांचे कृत्य ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत येते. या प्रकरणी राष्ट्रीय बालअधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस बजावून राहुल गांधी यांचे ट्विट हटविण्यास सांगितले होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसारही कारवाई करण्याचे बजावले होते.

Advertisement

ट्विटरने त्यानंतर राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट काही काळापुरते सस्पेंड केले आहे. राहुल गांधी यांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्यास सांगितलंय.

राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका
दरम्यान, आता याच प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात मकरंद म्हादलेकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यात ट्विटर व दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कठाेर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement