SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवीन गॅस कनेक्शन घेणे झाले सोपे..! LPG कनेक्शनवर मिळणार कुटुंबाला ‘हा’ मोफत लाभ, पाहा तर खरं..

काही वर्षांपूर्वी नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे म्हटले, तर अनेक दिव्यांतून जावे लागत होते. मात्र, केंद्र सरकारने आता उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची प्रक्रिया फार सोपी केलीय. अगदी ऑनलाईन खरेदी करण्याइतकेच हे काम सोपे झालेय.

उज्ज्वला योजनेंतर्गत नागरिकांना आता एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेता येणार आहेत. हे सर्व गॅस कनेक्शन आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याने, त्यात कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव नाही.

Advertisement

अशा प्रकारे गॅस कनेक्शन बूक करण्यासाठी फक्त आधारकार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रांची झेराॅक्स प्रत गॅस एजन्सीला द्यावी लागेल. तसेच नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल.

केंद्र सरकार आता एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शनची सुविधा सतत विस्तारत आहे. ऑनलाईन अर्ज किंवा गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही अगदी सोपी केलीय. विशेष म्हणजे, यात बेसिक गॅस कनेक्शनवर जी सबसिडी मिळते, त्याच आधारे इतर कनेक्शनवरही सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

घरातील आई-वडील, भावंडे किंवा कुटुंबातील कोणत्याही नातेवाईकाच्या नावाने आधीच गॅस कनेक्शन घेतलेले असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त त्या पत्त्याची पडताळणी केली जाणार आहे.

गॅस सिलिंडर मिळणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन मूळ गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. त्याच्या पडताळणीनंतर नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement