SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

माझ्या बायकोचे नाव ‘जेनेलिया’ नाही हो..! रितेश देशमुखने केला बायकोच्या खऱ्या नावाबाबत खुलासा, पाहा काय म्हटलेय..?

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा-देशमुख, बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपे. सोशल मीडियावर ही जोडी खूप मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत ते संवाद साधतात, तर कधी धमाल-मस्ती करताना दिसतात.

जेनेलियाचा कालच (ता. 6 ऑगस्ट) वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त सोशल मीडियातून अनेक सेलिब्रिटी, तसेच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ही संधी साधत आपले अनेक खास फोटो, व्हिडिओ शेअर करीत रितेशनेही लाडक्या बायकोला जरा हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Advertisement

पण खरी बातमी पुढेच आहे. बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर रितेशने एक ट्विट केले. रितेशच्या या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. त्याची जोरदार चर्चाही रंगली. आपल्या ट्विटमध्ये रितेशने आपल्या बायकोचं खरं जेनेलिया नसून, वेगळंच असल्याचं सांगितलं.

रितेश आपल्या ट्विटमध्ये म्हणताे, की आतापर्यंत खरं तर चाहत्यांसह सगळेच आपल्या बायकोच्या नावाचा, म्हणजेच Genelia चा उच्चार ‘जेनेलिया’ असा करीत होते. मात्र, ते तसं नाही. बायकोचे नाव ‘जेनेलिया’ नसून, ‘जिनिलिया’ असं असल्याचे रिेतेशने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.

Advertisement

दरम्यान, रितेश व जेनेलिया वा जिनिलिया (रितेशच्या म्हणण्यानुसार) यांनी एका शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही मजेशीर घटना, काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. लग्नानंतर आमचे कधीही भांडण झाले नाही; पण लग्नापूर्वी जेनेलियासोबत झालेल्या वादामुळे आमचा ब्रेकअप झाला असता, असा खुलासा रितेशने केला होता.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement