SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाळा उघडण्याबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!!

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागावर सोपविल्याने विभागाची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीत शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय झाला. आता सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. तसेच, उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत.

कोणत्या भागात शाळा सुरू होणार?

Advertisement

राज्य सरकारने 01 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिक्षण विभागाकडे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यानंतर या निर्णयाची घोषणा होऊ शकते.

कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर राज्यात आता भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील (Rural Areas) पाचवी ते सातवीच्या शाळा 17 ऑगस्टपर्यंत (Maharashtra to reopen schools from August 17) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Advertisement

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यानंतर, ज्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्याच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले.

Advertisement

मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात एसओपीचे (SOP) पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या सहमतीने घेतला जाणार आहे, असे वर्षां गायकवाड म्हणाल्या.

15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू होणार?

Advertisement

महाविद्यालय 15 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार चालू असल्याचं, असं उदय सामंत यांनी मागील कुलगुरूंच्या बैठकीत सांगितलं आहे. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यानुसार प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. (Re-opening colleges in physical mode) प्रत्येक विभागात कुलगुरु व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या परिस्थितीनुसार महाविद्यालय सुरू करायचे की नाही, याबाबत संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार चालू आहे, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (State Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी सांगितलं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement