SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच का ठरतात अव्वल ? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक उत्तर, पाहा तर खरं..

राज्यात नुकतेच दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले. दरवर्षी निकाल जाहीर झाला, की प्रसार माध्यमातून एक वाक्य नेहमी समोर येते ते म्हणजे, ‘यंदाच्या निकालातही मुलीच अव्वल..’!

आता कोणतीही परीक्षा म्हटलं की विद्यार्थी जाम टेन्शनमध्ये असतात. घरातले सगळे सतत अभ्यासासाठी मागे लागलेले असतात. त्यातही बोर्डाची परीक्षा असेल, तर विचारायलाच नको.. अभ्यासाचा लकडा सतत मागे लागलेला असतो.

Advertisement

मुलांसह मुलींनाही परीक्षेचा, अभ्यासाचा ताण आलेला असतोच की..! पदरी अपयश तर पडणार नाही ना, अशी एक अनामिक भीती मनात असते. मात्र, या सगळ्यातून मुलीच कशा मार्ग काढतात ? परीक्षेत अव्वल ठरतात…?

हे नेमके कशामुळे होत असेल, यासाठी फ्रान्समधील ‘ऑर्गनायझेशन फाॅर इकोनाॅमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट’ (Organisation for Economic Co-operation and Development) या संस्थेने अभ्यास केला. संस्थेच्या अभ्यासातून काही धक्कादायक गोष्टी पुढे आल्या.

Advertisement

संस्थेने 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या परीक्षेतील कामगिरीची तपासणी केली. त्यात गणित-विज्ञान शाखेतील काही मुले मुलींपेक्षा हुशार असले, तरी एकूण निकाल मुलींच्या बाजूने असल्याचे समोर आले. विविध निकषांच्या आधारे संस्थेने अभ्यास केल्यानंतर मुली या मुलांपेक्षा सरस असल्याचेच समोर आले.

मुलींना वाचनाची आवड
मुलींना वाचनाची आवड जास्त असते, तर अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. अनेक मुली दिवसातून किमान अर्धा तास तरी वाचन करतात. दुसरीकडे एक तृतीयांश मुलेही वाचन करीत नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

Advertisement

मुलींचा ‘अटेन्शन स्पॅन’ चांगला
शाळेत मुली लक्ष केंद्रित (Good Attention span) करून शिकतात, तर मुलं जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने परीक्षेत कमी पडत असल्याचे कॅनडातील न्यू ब्रंसविक विद्यापीठातील प्राध्यापकांनी म्हटलंय.

मुलांना वाईट सवयी
मुले त्यांचा मोकळा वेळ ऑनलाइन गेम, इंटरनेटवर घालवितात. कुटूंबाकडून त्यांना प्रोत्साहन कमी मिळतं. याउलट मुली कुटुंबीयांसाेबत अधिक वेळ घालवतात. घरातून त्यांना अधिक चांगले गुण मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

Advertisement

आमच्या बातमीतून मुलं किंवा मुली असा भेद करण्याचा अजिबात हेतू नाही. प्रत्येकानेच योग्य प्रकारे आपल्या पात्रतेनुसार अभ्यास केल्या कोणीही कुठेही कमी नसल्याचेच दिसून येते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement