टीम इंडियाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टिक’ हटविण्यात आली आहे. ही ‘ब्लू टिक’ म्हणजे संबंधित व्यक्तीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट असल्याचे मानलं जातं. मात्र, धोनीने बराच काळ ट्विटरचा वापर केलेला नसल्याने ही ‘ब्लू टिक’ काढण्यात आल्याचे सांगितलं जाते.
दरम्यान, याबाबतचे वृत्त व्हायरल झाल्यावर ट्विटरकडून तातडीने माहीच्या अकाऊंटला पुन्हा एकदा ही ब्लू टिक लावण्यात आली. मात्र, याबाबत ट्विटरने काेणतीही माहिती दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पर्सनल ट्विटर अकाउंटवरून ‘ब्लू टिक’ हटविल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर, असे युद्ध रंगले होते. या वादात अखेर ट्विटरला माघार घ्यावी लागली होती.
दरम्यान, ट्विटरनं आता महेंद्रसिंह धोनी याच्या ट्विटर अकाऊंटवरची ‘ब्ल्यू टिक’ हटवली आहे. धोनीचे आजही ८ मिलियनहून (८० लाख) अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, त्याने आपले अखेरचं ट्विट 8 जानेवारी 2021 रोजी केलं होतं. सुरुवातीला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असणाऱ्या धोनीने 2018 नंतर मात्र अचानक ट्वीट करण्याची संख्या कमी केली.
आता एमएस धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. त्यामुळे धोनीचं काय चाललंय, याची माहिती त्याच्या चाहत्यांना कळत असते. मागील वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. विशेष म्हणजे, धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याचे सोशल मीडियातूनच सांगितले होते.