SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी ‘आरटीओ’चे खेटे बंद, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!

कोणतेही वाहन तुम्ही चालवित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रस्त्यावर कोणतेही वाहन चालविण्यापूर्वी तुमच्याकडे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving licence) असणे गरजेचे असते, नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अर्थात ‘आरटीओ’ (RTO) तूनच आतापर्यंत लर्निंग व नंतर पक्के लायसन्स दिले जात होते. मात्र, रस्ते व महामार्ग मंत्रालयाने आता लायसन्स देण्याच्या नियमांत काही बदल केले आहेत. त्यानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.

Advertisement

खासगी वाहन उत्पादन संघटना, एनजीओ, कायदेशीर खासगी कंपन्यांना चालक प्रशिक्षण केंद्र चालविता येते. नव्या नियमांनुसार या चालक प्रशिक्षण केंद्रातर्फेच आता चालकाचे निर्धारित प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ दिले जाणार आहे.

याबाबत रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी (ता.4 ) निर्देश दिले आहेत. चालक प्रशिक्षण केंद्रासह RTO कार्यालयातूनही लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, ऑटो मोबाईल असोसिएशन, खासगी वाहन उत्पादक, स्वायत्त संस्थाही चालक प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, अशा संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत निर्धारित जमिनीवर आवश्यक पायाभूत सुविधा असणे बंधनकारक आहे.

मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्याच्या तंत्रातील तरतुदींना राज्य सरकारला व्यापक प्रसिद्धी द्यावी लागेल. वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्रासाठी (DTC) अर्ज दिल्यानंतर 60 दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना त्यास मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे निर्देश दिले आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement