SpreadIt News | Digital Newspaper

‘जय भीम’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; सूर्याने शेअर केला चित्रपटाचा फर्स्ट लुक!

0

दाक्षिणात्य अभिनेता-निर्माता सूर्या लवकरच ‘जय भीम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. हा त्याचा 39 वा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो वकीलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘जय भीम’ चित्रपटातील त्याने त्याचे लुकचे दोन फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चित्रपटाचं जबरदस्त नाव आणि त्यातील अभिनेता ‘सूर्या’चा लुक पाहून चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सूर्याने ‘जय भीम’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर (Jay Bhim Movie First Look) सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Advertisement

‘जय भीम’ चित्रपटाविषयी आणखी काही…

‘जय भीम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेता सूर्याने काळा कोट परिधान केलेला असून यात तो खूप विचारी दिसून येतोय. तसंच दाक्षिणात्य अभिनेता सूर्यासोबतच काही हक्कासाठी लढणारा लोकांचा समुह दाखवला आहे. त्याने पोस्टर शेअर करताना ‘जय भीमचा पहिला लुक शेअर करण्यास मला खूप आनंद झाला आहे’, असे लिहिले आहे.

Advertisement

साउथ अभिनेता सूर्या (Suriya) ‘सिंघम’ (Singham) बनून याआधीच घराघरांत पोहोचला आहे. आता त्याच्या ट्विटर अकाउंटवर त्याने चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. (Southern actor Suriya shared ‘Jai Bhim’s first look) सूर्या या चित्रपटात एका वकीलाची भूमिका साकारणार असल्याचं पोस्टरवरून दिसतंय. टी.एस. गणनवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन व लेखन केले आहे.

सूर्या या चित्रपटात एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार हे आता पक्के झाले आहे. सूर्यासोबतच प्रकाश राज आणि रशिशा विजयन यांच्यापण महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान कोरोनाच्या दुसर्‍या लाटेआधी चेन्नईमध्ये जय भीमचे शूटिंग सुरू झाले होते. पण कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ते वेळीच थांबविण्यात आले होते. या सिनेमात अभिनय करण्याबरोबरच सूर्याची निर्मिती देखील असणार आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊस ‘2 डी एन्टरटेन्मेंट’ च्या साहाय्याने हा चित्रपट बनवत आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement