SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल सुरू, ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार बंपर डिस्काउंट..

फ्लिपकार्ट (Flipkart) ने 5 ऑगस्ट पासून आपला बिग सेविंग डेज सेल (Big Saving Days Sale) ची घोषणा केली आहे. आजपासून Flipkart वर हा ऑनलाईन सेल चालू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट, स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर हा सेल 9 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.

Flipkart च्या सेलविषयी अधिक जाणून घेऊया..

Advertisement

स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत आणि टीव्ही आणि अप्लायन्सेजवर 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यासोबतच मोबाइल आणि टॅबलेट वर नो कॉस्ट ईएमआय आणि अतिरिक्त एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. याचसोबत या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये कपड्यांवर देखील 80 टक्क्यांची सूट मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या सेलमध्ये कंपनी खासकरुन स्मार्टफोनवर मस्त डिल्स देणार आहे. नेहमीप्रमाणे फ्लिपकार्ट आपल्या सेलमध्ये Axis, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट सारखे ऑफर देत आहे. या व्यतिरिक्त युजर्सला नो कॉस्ट EMI, एक्सजेंच ऑफरचा सुद्धा फायदा घेता येणार आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट प्लस सदस्य यातील डील्समध्ये 24 तासांपूर्वीच ॲक्सेस करू शकतील.

Advertisement

▪️ Asus ROG Phone 3 (28% सूट)

आसूसचा 8 GB रॅम व 128 GB मेमरी स्टोरेज असणारा आरओजी फोन आता 55,999 रुपयांना नाही, तर केवळ 39 हजार 999 रुपये किंमतीत या सेलमध्ये खरेदी करु शकणार आहे.

Advertisement

▪️ Motorola Razr ( 63% सूट)

फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान मोटोरोला रेजरवर उत्तम ऑफर मिळणार आहे. Motorola Razr फोल्डेबल स्मार्टफोनची फ्लिपकार्टवरील किंमत 1,49,999 रुपये आहे; परंतु हा स्मार्टफोन सेलमध्ये असल्या कारणाने तो फक्त 54 हजार 999 रुपयात खरेदी करू शकता. यात 6 GB रॅम व 128 GB मेमरी स्टोरेज असणार आहे.

Advertisement

▪️ Mi 10T (17% सूट)

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये शाओमीच्या Mi 10T (Cosmic Black, 6 GB RAM, 128 GB) हा 39,999 नव्हे तर फक्त 32,999 रुपयांत मिळणार आहे. यात फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा (यात तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊनही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता) समावेश आहे.

Advertisement

महत्वाचं: बातमीत उल्लेख केलेल्या ऑनलाईन सेलमध्ये असलेल्या प्रॉडक्टच्या किंमती व सूट अशा काही ऑफर्स या सेल असेपर्यंतच आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement