SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या 10 हजारांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय..! घरबसल्या मोठ्या कमाईची संधी, पाहा तर खरं..!

रोजच्या जेवणातील एक चटकदार पदार्थ म्हणजे लोणचं..! अनेकांना रोजच्या पदार्थांत लोणचे नसेल, तर जेवण अपूर्ण वाटते. आरोग्याच्या दृष्टीनेही लोणच्याचे एक वेगळे महत्व आहे.

याच लोणच्याद्वारे तुम्ही घरबसल्या कमाईही करु शकता, तेही अगदी थोड्या भांडवलात.. चला तर मग लोणच्याचा व्यवसाय (Pickle making business) कसा करता येईल, त्यातून किती कमाई होऊ शकेल, याबाबत जाणून घेऊ या..!

Advertisement

लोणचं बनविण्याचा व्यवसाय सुरु करायचे म्हटले, तर तुमच्या खिशात फक्त १० हजार रुपये हवेत. सोबत हवी साधारण 900 स्क्वेअर फूट जागा.. कारण, लोणचं तयार करणं, वाळवणे, तसेच त्याचे पॅकिंग करण्याच्या कामासाठी मोठी व मोकळ्या जागेची गरज लागेल

लोणचं तयार करण्याच्या ठिकाणी, तसेच लोणचं बनविताना स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. हे लोणचं तुम्ही ऑनलाईन, रिटेल मार्केट, रिटेल चेन अशा विविध माध्यमांमार्फतही विकू शकता. त्यातून तुम्हाला दरमहा 25 ते 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.

Advertisement

म्हणजेच, अगदी पहिल्याच महिन्यांत तुमची गुंतवणूक पूर्णपणे वसूल होते. यानंतर निव्वळ नफा मिळण्यास सुरुवात होते. जसंजसं तुमचा अनुभव वाढत जाईल, नवनवीन आयडिया वापरुन तुम्ही उत्पादन आणि खपही वाढवू शकाल. यशस्वी उद्याेगपती होऊ शकता.

व्यवसायासाठी लायसन्स आवश्यक
आता कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हटला म्हणजे, त्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणं आलेच.! लोणच्याचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वीही तुम्हाला परवाना काढावा लागेल. हा परवाना ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी’ (FSSAI) मार्फत दिला जातो. त्यासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येतो. एकदा का लायसन्स मिळाले, की तुम्ही मनमोकळेपणे हा व्यवसाय सुरू करू शकाल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement