SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

MG मोटर्सची जिओसोबत भागीदारी, आगामी SUV मध्ये मिळणार दणकेबाज फीचर्स!

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) सध्या भारतातील आघाडीची डिजिटल सर्विस प्रोवाइडर जिओ इंडिया या कंपनीसोबत (Jio) भागीदारीची घोषणा केली. MG Motors ने ही भागीदारी आपल्या आगामी मिड-साइज एसयूव्हीकरता केली आहे.

भारतामध्ये या कंपनीने MG Hector आणि ZS EV अशा दमदार कारची विक्री करणारी ही कंपनी आपल्या आगामी SUV मध्ये Jio च्या IoT सॉल्यूशन्सद्वारे एनेबल्ड आयटी सिस्टिमची सुविधा देणार आहे. कंपनीच्या या मोठ्या भागीदारीमुळे एमजी मोटर्सच्या आगामी मिड-साइज SUVच्या ग्राहकांना जिओच्या 4G नेटवर्कमुळे लांबच्या परिसरांमध्येही हाय-स्पीड इन-कार कनेक्टिव्हिटी मिळेल.

Advertisement

एमजी मोटर्सच्या आगामी मिड-साइज एसयूव्हीमध्ये ग्राहकांना केवळ मेट्रो शहरांमध्येच नाही तर लहान गावे व ग्रामीण भागातही, उच्च दर्जाच्या कनेक्टिव्हिटीसह जिओच्या बलाढ्य इंटरनेट नेटवर्कचा फायदा होईल.

जिओ कंपनीचे कनेक्टेड व्हेइकल सोल्युशन सॉफ्टवेअर, हार्डवेअर व कनेक्टिव्हिटी इ मिळून केलेले मिश्रण असेल आणि त्याद्वारे यूझरला ट्रेंडिंग इन्फोटेनमेंट आणि रिअल टाइम टेलिमॅटिक्सची आकर्षक सुविधा प्रवासातही मिळणार आहे. म्हणूनच डिजिटल लाईफचे लाभ वाहनाला तसेच प्रवासातील लोकांनाही मिळतात.

Advertisement

जिओचं eSIM, IoT आणि स्ट्रीमिंग सॉल्युशनचा फायदा:

वाहन क्षेत्रात सध्याचा ट्रेंड सॉफ्टवेअर चलित उपकरणांचा असून जिओसारख्या तंत्रज्ञान विकसकासोबत भागीदारी MG Motors कंपनीला वाहन क्षेत्राकडे महत्वाचं पाऊल पुढे टाकण्यास साहाय्य करेल, असं एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले.

Advertisement

भारतातील यूझर्ससाठी जिओचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने व सोल्युशन्सची एक इकोसिस्टिम तयार करत आहे. एमजी मोटर इंडियासोबतची जिओची भागीदारी ही महत्त्वाची समजली जात आहे. जिओचे ईसिम, आयओटी आणि स्ट्रीमिंग सोल्युशन्सद्वारे एमजीच्या ग्राहकांना रिअल टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेन्मेंट आणि टेलिमॅटिक्सची सुविधा मिळेल, असे जिओचे संचालक व अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement