SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: MPSC ची संयुक्त परीक्षा पुढील महिन्यात होणार, आयोगाकडून परिपत्रक जारी!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

MPSC च्या परीक्षेसाठी राज्यभरातून 3 लाख 82 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत होते. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पूर्नवसन, महसूल व वन विभागाच्या 3 ऑगस्टच्या पत्रातील अभिप्रायानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने तारीख जाहीर केली आहे.

Advertisement

आता एमपीएससीची ही परीक्षा (MPSC Exam) 4 सप्टेंबर 2021 रोजी (MPSC Exam 2021 Date) होणार आहे, अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारनं 3 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीचा प्रश्न आता राज्यपालांच्या पारड्यात गेला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रिया रखडत आहे किंवा नियुक्त्याही प्रलंबित आहेत. यामुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं सांगितलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement