SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तळीरामांसाठी ‘गुड न्यूज’.. आता किराणा दुकानातही मिळणार वाईन..! राज्य सरकारचे विशेष धोरण, नेमका काय प्रस्ताव आहे, जाणून घेण्यासाठी वाचा..

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाइनचीही निर्मिती महाराष्ट्रातच केली जाते. मात्र, या वाईनला म्हणावी तितकी मागणी नाही. त्यामुळे वाईनचा खप वाढविण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार केलंय. या ऑगस्ट महिन्यातच या धोरणाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

2020-21च्या आकडेवारीनुसार, देशात उत्पादित होणाऱ्या परदेशी मद्याची विक्री 200 दशलक्ष लिटर झाली. देशी दारू 320 दशलक्ष लिटर, बीअर 30 कोटी लिटर, तर वाइनची केवळ 7 लाख लिटरच विक्री झाली. वाइनचे वर्गीकरण दारु म्हणून केले जाते. मात्र, अट्टल तळीरामांची पहिली पसंती दारुलाच असते. परिणामी, वाइनला म्हणावी तितकी मागणी नाही.

Advertisement

सध्या वायनरीजमध्येच वाइनची विक्री होते. किरकोळ विक्रेत्यांना वाइन विक्रीचे परवाने दिल्यास वाइनची रिटेल आउटलेट्सही उघडता येतील. ‘वॉक-इन स्टोअर’ कॅटेगरीत रिटेल आउटलेट्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट्समध्येही वाईनची विक्री करता येईल. केवळ वाइन बार्सही उघडता येतील.

राज्यात उत्पादित होणाऱ्या वाइनवर गेली 20 वर्षे उत्पादनशुल्क आकारलं जात नव्हतं. मात्र, आता ते 10 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून मिळणारी काही रक्कम वाइन बोर्डाला देण्याचा सरकारचा विचार आहे. वाइनचा दर्जा, मार्केटिंगवर हे बोर्ड काम करील.

Advertisement

दरम्यान, देशात आजघडीला एकूण 110 वायनरीज आहेत. पैकी सर्वाधिक 72 वायनरीज एकट्या महाराष्ट्रात आहेत. मात्र, त्यातील केवळ 20 वायनरीज वाइन उत्पादन घेतात. अन्य वायनरीज मोठ्या उत्पादकांसाठी काँट्रॅक्टवर उत्पादन करतात.

नाशिक ‘वाइन अँड ग्रेप कॅपिटल ऑफ इंडिया’
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत असल्याने तेथे सर्वाधिक वायनरीज आहेत. त्यामुळे नाशिकला ‘वाइन अँड ग्रेप कॅपिटल ऑफ इंडिया’ असंही म्हटलं जातं. त्याखालोखाल सांगली, पुणे, सोलापूर, बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांत वायनरीजची संख्या आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement