SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या लहान मुलांचं आधार कार्ड अपडेट आहे का? नसेल तर ‘या’ कारणामुळे होऊ शकतं निष्क्रिय!

भारतात आजकाल नागरिकांची ओळख म्हणजेच जणू आधार कार्ड (Aadhaar Card) असं झालं आहे. आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. प्रत्येक वयोगटासाठी हे आवश्यक ठरतं. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे बहुतांश ठिकाणी वापरलं जातं.

नवजात बाळांचंही आधार कार्ड बनवलं जातं. बर्थ, डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई-वडिलांच्या आधार कार्डद्वारे नवजात बाळांचं आधार कार्ड बनवलं जातं. परंतु अगदी लहान असताना बनवलेल्या आधार कार्डमध्ये नंतर अपडेट (Adhar Card Update) करणं महत्त्वाचं ठरतं.

Advertisement

मुलांचं आधार कार्ड अपडेट न केल्यास..

मुलांच्या 5 वर्षानंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट (Biometric Update) करणं गरजेचं असतं. त्यांचं आधार कार्ड अपडेट न केल्यास मुलांचं आधार कार्ड निष्क्रिय (inactive) होऊ शकतं, याबाबत UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

मुलांच्या आधार कार्डचा वापर 5 वर्षांपर्यंत केला जाऊ शकतो. जर 5 वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट केलं नाही, तर मुलांचं आधार कार्ड निष्क्रिय होतं. मग मुलं 15 वर्षांची झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक असतं. (Remember to update the biometrics of your child in Aadhaar at the age of 5 years and again at the age of 15 years)

मुलांचं बायोमेट्रिक अपडेट करणं पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतंही शुल्क (Fee) भरावं लागत नाही. बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार सेंटरवर (Adhar Center) जावं लागेल.

Advertisement

मुलांचं आधार अपडेट करण्यासाठी..

▪️ अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी UIDAI च्या पुढील वेबसाईटला भेट द्या 👉 appointments.uidai.gov.in/easearch.aspx

Advertisement

▪️ वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे Get Adhar च्या पॉइंटमध्ये Book an Appointment वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

▪️ मग पुढे माहीती भरुन Proceed to Appointment वर क्लिक करा.

Advertisement

▪️ तुम्ही भरलेली सर्व माहीती परत एकदा तपासून घ्या आणि अपॉईंटमेंट बुकसाठी ‘सबमिट’ (Submit) या बटणावर क्लिक करा.

▪️ यानंतर सर्व माहीती व कागदपत्र घेऊन आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जावं लागणार आहे.

Advertisement

लक्षात असुद्या की, 5 वर्षाखालील मुलांचं आधार कार्ड बनवताना फार काही अटी पूर्ण करण्याची गरज भासत नाही, जसे की , बायोमेट्रिक डेटाचीही गरज नाही. तसेच आधारची प्रोसेस व ऑथेंटिकेशन पालकांच्या डेमोग्राफी आणि फोटोवरुनच मुलांचं आधार व्हेरिफिकेशन (Adhar Verification) होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement