SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या निकालात मुलीच हुश्श्यार ! आश्चर्यम्.. 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क, असा पाहता येणार निकाल..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

बारावीचा एकूण निकाल 99.63 टक्के  लागला आहे. विज्ञान शाखा 99.45 टक्के, वाणिज्य 99.91 टक्के,  कला शाखेचा निकाल 99.83 टक्के लागला असून, यावर्षी 8.97 टक्क्यांनी निकाल वाढल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

Advertisement

राज्यात कोकण विभाग अव्वल ठरले असून, औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारलीय. मुलींचा निकाल 99.81 टक्के, तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे. मागच्या वर्षी मुलांचा निकाल  90.66 टक्के होता.

बारावीच्या निकालाची आकडेवारी
– 6,542 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला.
– 35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी आहेत.
– 46 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहेत.

Advertisement

– 91,435 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.
– 1372 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

– 13,19,754 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, पैकी 13,14,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (एकूण निकाल 99. 63 टक्के)
– 66,871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 66,867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (निकाल 94.31 टक्के)

Advertisement

विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी
पुणे – 99.75
नागपूर- 99.62
औरंगाबाद- 99.34
मुंबई- 99.67

कोल्हापूर- 99.67
अमरावती- 99.37
नाशिक- 99.61
लातूर- 99.65
कोकण – 99.81

Advertisement

मुला-मुलींचा निकाल
मुले – 99.54 टक्के
मुली -99.81 टक्के

शाळांना कुठे निकाल पाहता येणार ?
www.mahahsscboard.in शाळांचा एकत्रित निकाल पाहता येणार.
www.mahresult.nic.in
https:msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती मिळेल.

Advertisement

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in

निकालातील फरक
– विज्ञान शाखेचा मागील वर्षी निकाल 96.93 टक्के, यावर्षी 99.45 टक्के (2.52 टक्क्यांनी जास्त)
– कला शाखेचा गेल्या वर्षी 82.63 टक्के निकाल, यंदा 99.45 टक्के (17.20 टक्क्यांनी जास्त)
– वाणिज्य शाखेचा मागच्या वर्षी 91.27 टक्के निकाल, यावर्षी 99.91 टक्के. (8.64 टक्क्यांनी जास्त)
– एमसीव्हीसीचा मागील वर्षाचा निकाल 86.07 टक्के, यावर्षी 98.80 टक्के, (12.73 टक्क्यांनी जास्त)

Advertisement

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा ?
स्टेप 1 : http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर सर्च सीट नंबरवर जा
स्टेप 2 : यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
स्टेप 3 : त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणे नमूद करा
स्टेप 4 : यानंतर सबमिट करा, तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement