SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण..! ‘या’ कंपनीने लाॅंच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स, बुकिंगसाठी रुपयाही देण्याची गरज नाही..

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अनेकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे दिसत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून ऑटो कंपन्याही सातत्याने इलेक्ट्रिक वाहने लाँच करीत आहेत.

ऑटो क्षेत्रातील एक मोठे नाव असणाऱ्या ऑटोमोटिव्ह स्टार्ट-अप ईवट्रिक (Evtric) मोटर्सने सोमवारी (ता. २) स्लो-स्पीड कॅटगरीमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. Evtric AXIS आणि Evtric RIDE या नावांनी या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत.

Advertisement

इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती
Evtric AXIS – 64,994 रुपये
Evtric RIDE – 67,996 रुपये
(विशेष म्हणजे, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगवर कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही)

बुकिंगसाठी अधिकृत वेबसाईट- https://evtricmotors.com किंवा ऑफलाइन पद्धतीने कोणतीही बुकिंग रक्कम न भरता तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर बूक करू शकता.

Advertisement

इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
– इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये एक स्वॅपेबल लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 250W ची पॉवरसह 150 किलो लोडिंग क्षमतेने लॅस आहे.
– बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात.


– स्कूटरचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र,
फूल चार्ज झाल्यावर या इलेक्ट्रिक स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकतात.

Advertisement

– Evtric AXIS चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यात मर्करी व्हाइट, फारसी रेड, लेमन येलो आणि एम्परर ग्रे यांचा समावेश आहे.
– Evtric RIDE ही स्कूटर डीप सेरुलियन ब्लू, फारसी रेड, स्लिव्हर, नोबेल ग्रे, मर्क्युरी व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement