SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आकर्षक फीचर्ससह Poco F3 GT स्मार्टफोन भारतात लाँच: जाणून घ्या काही खास वैशिष्ट्ये..

स्मार्टफोन ब्रँड पोको कंपनीने त्यांचा गेमिंग स्मार्टफोन ‘Poco F3 GT’ भारतीय बाजारात लॉंच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. यात टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन ब्रँड पोकोने पोको एफ3 जीटी लॉंच केला आहे. गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉंच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन मध्ये बरेच शक्तीशाली गेमिंग फीचर्स मिळणार आहे.

पोको एफ3 जीटी (POCO F3 GT) चे दमदार फिचर्स:

Advertisement

▪️पोको एफ 3 जीटी मध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक चिपसेट प्रोसेसर सोबतच डायमेंशन 1200 चिपसेट सुद्धा आहे. POCO F3 GT स्मार्टफोन 3.0 गीगाहर्ट्स वर कार्यरत आहे.

▪️ रॅम आणि स्टोरेज: 6जीबी+128जीबी, 8जीबी+128जीबी आणि 8जीबी+256 जीबी व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

▪️ POCO F3 GT ची किंमत: POCO F3 GT 25,999 रुपये, 27,999 रुपये आणि 29,999 रुपये (ई-कॉमर्स साईट्सनुसार किंमतीत कमी-अधिक बदल असू शकतो.) किंमतीला उपलब्ध आहे.

▪️ कलर्स: गनमेटल सिल्वर (Gunmetal Silver) आणि प्रीडेटर ब्लॅक (Predator Black) या स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध असणार आहे.

Advertisement

▪️ डिस्प्ले: 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस रिजोल्यूशन, 120HZ रिफ्रेश रेट आणि एचडीआर10 प्लस सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोटेक्शनसाठी मागे आणि पुढे कॉनिर्ंग गोरिला ग्लास 5 देण्यात आली आहे.

▪️ ट्रिपल कॅमेरा सेटअप: 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी वरील बाजूला वॉटरड्रॉप नॉच दिला आहे.

Advertisement

बॅटरी, ऑडिओ आणि मल्टिटास्किंग

मल्टिटास्कींगसाठी हा फोन अतिशय उपयुक्त आहे. सिक्युरिटीसाठी यामध्ये फेस अनलॉक आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5065 mAh ची बॅटरी दिली असून ती 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. या व्यतिरिक्त वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट, ड्युएल स्पिकर्ससारखे फीचर्स असणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement