SpreadIt News | Digital Newspaper

पेटीएम 20 हजार बेरोजगार तरुणांना देणार नोकऱ्या, 35 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

0

लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी गेली असेल, तर आणि तुम्ही नवीन जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील मोठी डिजिटल पेमेंट कंपनी Paytm कर्मचाऱ्यांची फील्ड एक्झिक्यूटिव्ह पदासाठी नियुक्ती करणार आहे.

डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने व्यापाऱ्यांना डिजिटल माध्यमाचा वापर करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण भारतात तब्बल 20,000 क्षेत्र विक्री अधिकारी (Field sales Executives) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहीती आहे.

Advertisement

मासिक वेतन असणार 35,000 रुपयांपर्यंत

नोकरीशी संबंधित पेटीएमच्या जाहिरातीनुसार, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हना मासिक वेतन व कमिशनमध्ये 35,000 रुपये आणि त्याहून अधिक कमावण्याची संधी असेल. कंपनीला तरुण आणि पदवीधरांना एफएसई (FSE) म्हणून नियुक्त करायचे आहे.

Advertisement

अर्ज कोण करू शकतं? (How to Apply)

प्राप्त माहितीनूसार, किमान 18 वर्षे वयाची व्यक्ती, 10 वी 12 वी, ग्रॅड्युएट पास अशी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. पेटीएम ॲपच्या माध्यमातून या जागांसाठी अर्ज करता येईल.

Advertisement

उमेदवारांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. दुचाकी असणाऱ्यांना व अनुभवास प्राधान्य दिले जाईल. अर्जदारांना स्थानिक भाषा आणि क्षेत्राचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

Paytm कंपनी या कामासाठी अधिकाधिक महिलांनाही प्रोत्साहन देणार आहे. FSE पेटीएमचे सर्व प्रोडक्ट ज्यामध्ये ऑल इन वन QR कोड्स, POS मशीन, पेटीएम साउंडबॉक्सला (Paytm Soundbox) प्रमोट करतील. याशिवाय कंपनीचे वॉलेट, युपीआय, पेटीएम पोस्टपेड, व्यापाऱ्यांसाठी कर्ज आणि इन्शुरन्सचे प्रमोशन करतील.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement