SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’कडून 15,500 जागांच्या मेगा भरतीचा मार्ग मोकळा; ‘हा’ शासन निर्णय जारी!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक विभागांमधील उपसमितीकडून परवानगी मिळाल्यानंतर उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात आली, त्यासंबंधी 30 जुलै रोजी या पदभरतीबाबतचा जीआर (GR) वित्त विभागाने जारी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षीय बैठकीत 28 जुलैला फक्त दोनच दिवसांत वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी केला गेला. शासनाने ही रिक्त पदे भरण्यासाठी त्या-त्या संबंधित विभागांनी बिंदुनामावली तयार करून व उचित मंजुरी घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठवावा, असं शासन निर्णयात सांगितलं गेलं आहे. त्यामुळे आता MPSC मार्फत 15 हजार 500 हून अधिक पद भरतीचा (Recruitment of 15,500 posts from MPSC) मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

काही महत्वाचे मुद्दे:

▪️ ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे मुळे फक्त सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीसाठी यापूर्वी मंजुरी मिळाली होती.

Advertisement

▪️दरम्यान 4 मे 2020 आणि 24 जून 2021 च्या शासन निर्णयाला अनुसरून राज्यामधील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर निर्बंध आले होते.

▪️ विशेष बाब म्हणून MPSC मार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त पदांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement

▪️ त्यानुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे रिक्त पदांचा प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी राज्यात 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती करण्याचे विधिमंडळात जाहीर केले आहे. त्या प्रक्रियेला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी याआधी दिल्या होत्या.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement