SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : बारावीचा निकाल जाहीर..! कुठे, कसा पाहणार निकाल जाणून घेण्यासाठी वाचा..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी (ता. 3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे. मंडळाने जाहीर केलेल्या परीक्षा क्रमांकांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी https://mh-hsc.ac.in या वेबसाईटला भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

Advertisement

दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्याकंन व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढता येईल.

निकाल कुठे पाहणार..?
https://hscresult.11 thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in. .
https://lokmat.news18.com
www.mahresult.nic.in
https://msbshse.co.इन

Advertisement

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला
कोरोनामुळे 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने ३०:३०:४० या मूल्यमापन पद्धतीनुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीमधील कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ठ गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

त्यानंतर 30 टक्के गुण अकरावीच्या अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारीत आहेत. तर उरलेले 40 टक्के गुण बारावीत घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांच्या गुणांवर देण्यात आले आहेत..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement