SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्राचा श्वास मोकळा..! अखेर 25 जिल्ह्यांतील निर्बंध हटवले, काय सुरु – काय बंद राहणार..?

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांचा श्वास अखेर मोकळा झाला. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार, या जिल्ह्यातील निर्बंध अखेर शिथील करण्याचा आदेश आज (ता. २) देण्यात आला.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, बीड, नगर, रायगड आणि पालघरमध्ये कोरोनाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने या जिल्ह्यात लेव्हल तीनचे निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र, २५ जिल्ह्यातील दुकाने आता रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.

Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका ओळखून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लेव्हल तीनचे निर्बंध जाहीर केले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना नियमावलीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तेथे कठोर निर्बंध लागू असतील.

काय बंद, काय सुरु राहणार..?
– कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांत कोरोना नियमावली (लेव्हल थ्री) लागू असेल. इतर जिल्ह्यांमध्ये सर्व दुकाने आठ वाजेपर्यंत उघडी राहतील.

Advertisement

– शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी दिली आहे.
– शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने उघडी राहू शकतील.
– गार्डन आणि मैदानं व्यायामासाठी खुली असतील. चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील.

– मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाण्यात निर्बंध कायम राहतील. त्यासंदर्भातला निर्णय स्थानिक आपात्कालीन यंत्रणा प्रशासन घेईल.
– सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील. प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा विभागण्याची सूचना केली आहे.

Advertisement

– शेतीविषयक कामकाज, सिव्हिल वर्क, औद्योगिक काम, मालवाहतूकीचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू राहील.
– जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे वातानुकूलित यंत्रणेविना 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू करता येणार. (शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सगळ्यांना परवानगी).

– चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स यांना परवानगी नाही.
– सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे बंदच राहतील.
– हॉटेलं 50 टक्के क्षमतेसह दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहू शकतात. पार्सल आणि टेक अवे यांना परवानगी.

Advertisement

– रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवासावर निर्बंध असतील.
– गर्दी टाळण्यासाठी वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूकसंदर्भातील रॅली, आंदोलन मोर्चे यांना परवानगी नाही.
– मास्क परिधान करणं अनिवार्य असेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement