SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल’कडून मोठा बदल..! आता ‘या’ मोबाईलवर You tube आणि Gmail चालणार नाही..!

सध्या सोशल मीडियासह यू ट्यूबवर (You tube) व्हिडीओ पाहणे, तसेच ई-मेल (Gmail) पाठविण्याचे कामही अनेक जण आता मोबाईलवरूनच करतात. मात्र, तुम्हीही you tube  आणि Gmail मोबाईलवरच पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.

गुगलने (Google) आपल्या प्रणालीत काही बदल केले आहेत. त्यानुसार आता 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनवर ‘साइन-इन’ करता येणार नाही. ‘गुगल’ने आपल्या वापरकर्त्यांना तसा ई-मेल पाठवून कळविले आहे. हा बदल 27 सप्टेंबरपासून लागू केला जाणार आहे.

Advertisement

आता तुम्हाला 27 सप्टेंबरपासून गुगल अॅप्स वापरायची असतील, तर किमान Android 3.0 हनीकॉम्बवर अपडेट करावे लागणार आहे. ही सिस्टम आणि अॅप लेव्हल ‘साइन-इन’वर परिणाम करील. मात्र, वापरकर्त्यांचा मोबाईल ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करण्यास सक्षम असले पाहिजे.

दरम्यान, सध्याच्या काळात अँड्रॉइडचे खूप जुने व्हर्जन वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. मात्र, आता त्यांनी जूना फोन फेकून द्यावा लागेल, असे दिसते. गुगल वापरकर्त्यांच्या अकाउंट सिक्योरिटी आणि डेटा सिक्योरिटीसाठी हा बदल करण्यात येत असल्याचे ‘गुगल’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा कमी व्हर्जनवरुन 27 सप्टेंबरनंतर गुगल अॅप्समध्ये साइन करण्याचा प्रयत्न केल्यास ‘username वा password error’ दिसेल. हा ईमेल काही वापरकर्त्यांसाठी इशाऱ्याचा संकेत म्हणून पाहिले जाऊ शकतो.

मोबाईल बदलण्याशिवाय पर्याय नसेल
जुन्या अँड्रॉइड व्हर्जन वापर करणाऱ्यांनी नवीन गुगल खाते किंवा फोन रिसेट करून पुन्हा ‘साइन इन’ करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना फोनवर तोच ‘एरर’ दिसेल. नवीन पासवर्ड तयार करुन पुन्हा ‘साइन इन’ केल्यानंतरही हाच ‘एरर’ दिसेल. त्यामुळे वापरकर्त्यांसमोर मोबाईल बदलण्याशिवाय पर्याय नसेल.

Advertisement